नांदेड - कोविड 19 लसीकरण मोहिमेची रंगीत तालीम आज नांदेड मध्ये घेण्यात आली. लसीकरणासाठी आरोग्य विभागाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी दिली.
पालिकेच्या सरकारी रुग्णालयात आज लसीकरण मोहीमेची रंगीत तालीम घेण्यात आली. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात पहिल्या टप्यात 17 हजार जणांना लस दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयात ,आरोग्य केंद्र आणि काही खाजगी रुग्णालये अशा एकूण 120 ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी आरोग्य विभाग सज्ज असून शासनाच्या आदेशानुसार पुढील टप्यात प्रत्यक्ष लसीकरण सुरू केलं जाणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.