शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

नांदेड जिल्ह्यात उद्दिष्ट ६० लाख; तयार रोपे दीड कोटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:47 AM

राज्यातील वृक्षतोड दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे़ पाऊस अनियमित झाला आहे़ येणाऱ्या काळातील परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी वृक्षलागवड हाती घेण्यात येत आहे़ यंदा शासनाच्या वतीने राज्यभरात १३ कोटी वृक्षलागवडीचा निश्चय केला आहे़ नांदेड जिल्ह्याला ६० लाख २० हजार ६८९ रोपांचे उद्दिष्ट दिले असले तरी वन विभागाच्या वतीने १ कोटी ७३ लाख ३५ हजारा रोपे तयार केली आहेत़ त्यामुळे मराठवाड्यात सर्वाधिक वृक्षलागवड नांदेड जिल्ह्यात होईल, असा अंदाज आहे़

ठळक मुद्देवन विभागाचे नियोजन : १ जुलैपासून वृक्षलागवड सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्यातील वृक्षतोड दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे़ पाऊस अनियमित झाला आहे़ येणाऱ्या काळातील परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी वृक्षलागवड हाती घेण्यात येत आहे़ यंदा शासनाच्या वतीने राज्यभरात १३ कोटी वृक्षलागवडीचा निश्चय केला आहे़ नांदेड जिल्ह्याला ६० लाख २० हजार ६८९ रोपांचे उद्दिष्ट दिले असले तरी वन विभागाच्या वतीने १ कोटी ७३ लाख ३५ हजारा रोपे तयार केली आहेत़ त्यामुळे मराठवाड्यात सर्वाधिक वृक्षलागवड नांदेड जिल्ह्यात होईल, असा अंदाज आहे़गतवर्षी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले होते़ यंदाच्या वृक्षलागवड नियोजन व विविध विभागांना उद्दिष्ट देण्याची जबाबदारी वन विभागाकडे सोपविण्यात आली आहे़ त्यानुसार वन विभागातील अधिकारी, कर्मचारी तयारीला लागले आहेत़ वेगवेगळ्या विभागांना वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे़जिल्ह्यातील उद्दिष्ट ६० लाख २० हजार ६८९ असले तरी वन विभागाच्या वतीने जवळपास जिल्ह्यातील ५ हजार ५६६ हेक्टरवर ८४ लाख ५७ हजार ६५१ रोपे लागवड प्रस्तावित केली आहे़ यामध्ये सर्वाधिक वन विभागाच्या १९४५ हेक्टरवर १९ लाख १२ हजार २६५ रोपे प्रस्तावित केले आहेत़शासनाच्या वतीने वन विभागास १८ लाख ५० हजारांचे उद्दिष्ट दिले आहे़ त्याचबरोबर सामाजिक वनीकरण विभाग - ६ लाख, वनविकास महामंडळ किनवट - ३ लाख २६ हजार, ग्रामपंचायत - १६ लाख ३९ हजार २५०, कृषी - ६९ हजार ८१०, नगर विकास - १५ हजार, जलसंपदा - ३१ हजार १०, इतर विभागांना १४ लाख ८ हजार ६१९ असे एकूण ६० लाख २० हजार ६८९ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ दरम्यान, सदर वृक्षलागवडीसाठी नांदेड वन विभागाच्या वतीने जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या जमिनी आणि रोपांची संख्या प्रस्तावित करून विविध विभागांना उद्दिष्ट दिले आहे़यामध्ये वन विभागाच्या १९४५ हेक्टरवर १९ लाख १२ हजार २६५ रोपे, सामाजिक वनिकरण - ३१२ हेक्टरवर ८ लाख ८२ हजार ३९३ रोपे, एफडीसीएम - ८० हेक्टरवर १० लाख ९ हजार २०० रोपे, ग्रामपंचायत - ४४९ हेक्टरवर १६ लाख ५० हजार, सार्वजनिक बांधकाम - ४ लाख २३ हजार १ रोपे यासह नगरविकास विभाग, कृषी, उच्च व तंत्र शिक्षण, जलसंपदा, सामाजिक न्याय विशेष सहाय्य, सार्वजनिक आरोग्य विभाग, ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य, गृह, परिवहन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, गृह विभाग, ग्रामविकास विभाग, पदुम, महसूल, मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा रेशीम कार्यालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कापूस संशोधन केंद्र, जिल्हा कारागृह, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय आदींना उद्दिष्ट प्रस्तावित केले आहे़त्यानुसार जिल्ह्यात ५ हजार ५६६ हेक्टरवर ८४ लाख ५७ हजार ६५१ वृक्षलागवड होईल़--७५ रोपवाटिकेत १ कोटी ७३ लाख रोपटीजिल्ह्यात विविध रोपवाटिकांमध्ये १ कोटी ७३ लाख ३५ हजार रोपे उपलब्ध आहेत़ यामध्ये वन विभागाच्या १०६ रोपवाटिकेत ९७़०६ लाख तर सामाजिक वनीकरण विभागाच्या ७५ रोपवाटिकेअंतर्गत ७६़२९ लाख रोपे उपलब्ध आहेत़ यामध्ये चिंच, लिंब, आवळा आदी प्रकारच्या वृक्षांची रोपे आहेत़---सर्व घटकांनी पुढे यावेअमरावाड्यात जंगल कमी असून ती कमतरता भरून काढण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या वृक्षलागवड कार्यक्रमात सर्व घटकांनी सहभागी होणे गरजेचे आहे़ तसे नियोजन आम्ही करीत असून विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना या उपक्रमाचा भाग बनविले जाईल़ मुबलक प्रमाणात रोपे उपलब्ध असून १ ते ३१ जुलै दरम्यान वृक्षलागवड करून जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल़ - आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक, नांदेड वनविभाग़

टॅग्स :Nandedनांदेड