शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

नांदेड जिल्ह्यातील सातशेवर अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 12:54 AM

पोलीस दलात सध्या सर्वसाधारण बदल्यांचा हंगाम सुरु आहे़ काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या़ त्यानंतर सातशेवर अधिकारी आणि कर्मचाºयांच्या बदल्यांचेही आदेश येवून धडकले आहेत़ त्यामध्ये ५ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ५७ सपोउपनि समावेश आहे़ यंदा पहिल्यांदाच पोलीस कर्मचाºयांच्या समन्वयाने बदल्या करण्यात आल्या़ त्यामुळे कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण होते़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पोलीस दलात सध्या सर्वसाधारण बदल्यांचा हंगाम सुरु आहे़ काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या़ त्यानंतर सातशेवर अधिकारी आणि कर्मचाºयांच्या बदल्यांचेही आदेश येवून धडकले आहेत़ त्यामध्ये ५ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ५७ सपोउपनि समावेश आहे़ यंदा पहिल्यांदाच पोलीस कर्मचाºयांच्या समन्वयाने बदल्या करण्यात आल्या़ त्यामुळे कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण होते़स्थानिक गुन्हे शाखेसह वेगवेगळ्या ठाण्यांची जबाबदारी सांभाळणाºया काही पोलीस निरीक्षकांच्या यापूर्वीच जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत़ त्यानंतर अधिकारी, कर्मचाºयांच्या बदल्यांची जम्बो यादी प्रकाशित करण्यात आली़ त्यात पोनि़विठ्ठल चव्हाण यांना परभणीला पाठविण्यात आले आहे़त्याचबरोबर संदीपान शेळके-परभणी, अंगद सुडके-हिंगोली, सुरेश दळवे-परभणी, अरुण जगताप-हिंगोली येथे बदली करण्यात आली आहे़ तर दादाहरी चौरे, रवींद्र बोरसे, लक्ष्मण राख व मधुकर कारेगावकर हे पोलीस निरीक्षक इतर जिल्ह्यांतून नांदेडला येणार आहेत़ यंदा पहिल्यांदाच पोलीस कर्मचाºयांसाठी समन्वयाने बदल्यांची संकल्पना राबविण्यात आली़ त्यामध्ये एकाच ठिकाणी कार्यकाळ पूर्ण करणाºया ६१३ पोलीस कर्मचाºयांचा समावेश होता़ कर्मचाºयांची बदल्यांच्या वेळची मानसिकता लक्षात घेवून त्यांना सोयीचे होईल, अशा ठिकाणी बदलीसाठी समन्वय राखण्यात आला़---सपोनि ओमकांत चिंचोलकर हिंगोलीलापोलीस अधीक्षकांचे विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखेत धडाकेबाज कामगिरी करणारे सपोनि ओमकांत चिंचोलकर यांची हिंगोलीला बदली झाली आहे़ तीन ते चार महिन्यांच्या काळात सपोनि चिंचोलकर यांनी विशेष पथकाच्या माध्यमातून जिल्ह्यात अवैध धंदे करणाºयांना सळो की पळो करुन सोडले होते़ कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता़ परंतु, मध्यंतरी स्थागुशाचे पोनि़संदीप गुरमे यांच्यासोबत झालेल्या वादानंतर सपोनि चिंचोलकर यांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले होते़ त्यानंतर काही दिवसांत गुरमे यांची रवानगीही पोलीस अधीक्षक मीना यांनी नियंत्रण कक्षात केली होती़ काही दिवसांपूर्वीच गुरमे यांची औरंगाबाद बदली झाली असून आता चिंचोलकर यांना हिंगोलीला पाठविण्यात आले़---कोणाला मुदतवाढ तर कोणाच्या बदलीला स्थगितीपोउपनि अमोल कडू, सुशीलकुमार चव्हाण, मिर्झा अन्वर मिर्झा इब्राहिम बेग, सय्यद मोईनोद्दीन, म़इब्राहिम, मारोती चव्हाण, मधुकर वाघमारे, सदाशिव सूर्यतळे, बापूराव पवार, बाबू खेडकर, गंगाधर लष्करे, माधव झडते, व्यंकटी एडके, वैभव नेटके, परशुराम मराडे, अमृता बोरचाटे, श्रीदेवी पाटील, शीतल चव्हाण, विनायक शेळके, मनोजकुमार पांडे, किरण पठारे, अनिता चव्हाण, व्यंकट भारती या पोलीस उपनिरीक्षकांना एक वर्ष मुदतवाढ किंवा बदलीला स्थगिती देण्यात आली आहे़ दरम्यान, पोलीस दलातील आणखीही काही अधिकारी ठाणे मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत़

 

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसTransferबदली