शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

नांदेडमधील शेतकऱ्याच्या लेकीचं अमेरिकेत उड्डाण; १४ व्या वर्षी विमान उडवत साऱ्यांना केले चकित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 8:01 PM

Motivation news : गावाच्या कन्येने १४ व्या वर्षी विमान उडवल्याच्या यशाची बातमी कोंढा येथे कळताच तिचे आजोबा केशवराव जोगदंड आणि संपूर्ण जोगदंड परिवारासह कोंढेकर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.

ठळक मुद्देआता १४ वर्षीय रेवाने विमानाने आकाशास गवसणी घातल्याने कोंडा गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

 गोविंद टेकाळे

अर्धापूर(नांदेड) :  नांदेड जिल्ह्यातील कोंढा या गावच्या जोगदंड कुटुंबातील १४ वर्षीय रेवा या कन्येने पायलटचे प्रशिक्षण घेत अमेरिकेत यशस्वीरीत्या विमान उडवले आहे. तिच्या या कामगिरीची माहिती मिळताच कोंढा गावात  आंदोत्सव साजरा होत असून नांदेडकरांचा ऊर भरून आल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.  ( Nanded Farmer daughter's became pilot in US) 

कोंढा येथील शेतकरी केशवराव बालाजी जोगदंड यांचा मुलगा दिलीप २० वर्षांपूर्वी अमेरिकेत शिक्षण आणि नोकरीनिमित्त गेला होता. दिलीप आणि त्यांची पत्नी दोघे मेक्निकल इंजिनीअर आहे. ते पत्नी आणि मुली सोबत टेक्सास या प्रांतात स्थायी झालेले आहेत. दिलीप यांनी 'स्ट्रिंग कंट्रोलेड प्लेन' या विषयी संशोधनकरून यशस्वी प्रयोग केले आहेत. वडिलांच्या या संशोधनातून मुलगी रेवा हिने प्रेरणा घेत बालपणापासूनच वैमानिक होण्याचे स्वप्न पाहिले. हे स्वप्न उराशी बाळगून तिने वडिलांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल सुरू केली. वैमानिक होण्याचे सर्व तांत्रिक प्रशिक्षण आणि शिक्षण घेत रेवाने अखेर दि. २० जूनला आकाशात यशस्वी झेप घेत आपले स्वप्न पूर्ण सत्यात उतरवले आहे. गावाच्या कन्येने १४ व्या वर्षी विमान उडवल्याच्या यशाची बातमी कोंढा येथे कळताच तिचे आजोबा केशवराव जोगदंड आणि संपूर्ण जोगदंड परिवारासह कोंढेकर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. आपल्या गावातील मुलीने अमेरिकेत जाऊन पायलट होण्याचे स्वप्न साकार केल्याबद्दल ग्रामस्थांचा ऊर अभिमानाने भरून आल्याच्या भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. 

 

अधार्पूर तालुक्यातील कोंढा हे गाव अतिशय लहान असून येथील व्यवसाय हा शेती आहे. तरीही शेती व्यवसायातून येथील काही कुटुंबांनी मोठी प्रगती साधली आहे. त्याच बरोबर शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन प्रयोग केले जातात. तर येथील काही नागरिकांनी आधुनिक टेक्नॉलॉजी आत्मसात करून नवनवीन व्यवसायात यशस्वी पाऊल टाकले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी राम कदम या प्रगतीशील शेतकऱ्यांनी आपल्या बहिणीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तिच्या लग्न समारंभात हेलीकॉप्टरमधून वरात काढून तिची सासरी पाठवणी केली होती. यामुळे कोंढा हे गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले होते. आता १४ वर्षीय रेवाने विमानाने आकाशास गवसणी घातल्याने कोंडा गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

अभिमान वाटतोरेवाने विमान उडवले याचा नक्कीच अभिमान आहे. आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता याच्या जोरावरच तिने यश मिळवले आहे. प्रत्येक स्त्रीने असाच स्वतः वरचा आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता कायम ठेवली तर यश संपादन करता येते.- शंकरराव कदम, पोलीस पाटील कोंढा

टॅग्स :Nandedनांदेडairplaneविमानpilotवैमानिक