नांदेड : रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त शहर वाहतूक शाखेच्या वतीने नागरिकांना वाहतुकीचे नियम पटवून देण्यात येत आहेत. तर दुसरीकडे बुलेट अन इतर दुचाकीवर लावलेल्या दादा, मामा, भाऊ अशा फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या चालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
सकाळपासून शहरातील चौकात वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहनांची तपासणी सुरू केली होती. यामध्ये फटका आवाज करणाऱ्या 5 बुलेट जप्त करण्यात आल्या असून पोलिसांनी आपल्या समक्ष त्या बुलेट चे सायलेन्सर बदलण्यास चालकांना भाग पाडले. तर विनापरवाना शहरात धावणारे 6 ऑटो जप्त करण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.