चौकट- सहा केंद्रावर होणार लसीकरण
जिल्ह्यात यापूर्वी नऊ केंद्रावर लसीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु, त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता सहा ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, श्री गुरू गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, मुगट प्राथमिक आरोग्य केंद्र, मुखेड, हैदरबाग आणि हदगांव या केंद्रांची निवड करण्यात आली आहे.
चौकट- १७ हजार ९९ जणांची निवड
कोरोना काळात फ्रंटलाईनवर असलेल्या आरोग्य विभागातील डॉक्टर आणि कर्मचारी यांना सर्वप्रथम लस देण्यात येणार आहे. त्यासाठी १७ हजार ९९ जणांची नोंदणी करण्यात आली आहे. लसीकरणासाठी आल्यानंतर अगोदर त्यांची ओळखपरेड घेतली जाणार आहे. त्यानंतरच लस देण्यात येणार आहे.
आणखी लस लवकरच मिळणार
पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला कोरोना लसीचे साडेआठ हजार वायल प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. तयारीही जय्यत करण्यात आली आहे. पहिली लस दिल्यानंतर दुसरी लस देण्यासाठी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे या काळात आणखी लस उपलब्ध होणार आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली.