लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या २०१८-१९ वित्तीय वर्षासाठीच्या अर्थसंकल्पीय सभेत ९६ कोटींच्या बजेटला मंजुरी देण्यात आली़ गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष आ़तारासिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली़अधीक्षक थानसिंग बुंगई यांनी तिसऱ्यांदा बजेट सादर केले़ यंदा मागील वर्षाच्या तुलनेत साडेसात कोटी रुपये अधिकची तरतूद करण्यात आली आहे़ मागील वर्षी ८८ कोटी ९ लाख ८८ हजार रुपयांचे बजेट होते़ यंदा विकासकामांवर खर्च करण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ तर शिक्षण व विविध उपक्रमांसाठी तीन कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत़ बजेटमध्ये एकूण १२ प्रस्ताव ठेवण्यात आले होते़ त्या सर्वांना मंजुरी देण्यात आली आहे़ गुरुद्वारा बोर्ड संचलित सीबीएसई पॅटर्न शाळेच्या इमारतीसाठी एक कोटी रुपये, शिलाई केंद्र व नवीन यात्री भवनसाठी दोन कोटी, नवीन शिलाई केंद्रासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़यावेळी गिल म्हणाले, सचखंड गुरुद्वारा येथील हेडग्रंथी पद अनेक वर्षांपासून रिक्त होते़ त्यावर कश्मीर सिंघ यांची नियुक्ती करण्यात आली़ तर मित ग्रंथी म्हणून अवतार सिंह शीतल यांची निवड करण्यात आली़त्याचबरोबर जोगेंद्रसिंह सुखई यांना पदोन्नती देण्यात आली़ गुरुद्वारा बोर्डात रोजंदारीवर काम करणाºया ३२२ कर्मचाºयांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे़ तर सेवादार पदावरील कर्मचाºयांना आता साडेसात हजार रुपये तर लिपीकांना साडेदहा हजार रुपये दरमहा वेतन देण्यात येणार आहे़बैठकीला भागेंद्रसिंघ घडीसाज, राजेंद्रसिंघ पुजारी, परमज्योतसिंघ चाहेल, गुरमिसिंघ महाजन, दलजीतसिंघ, इकबालसिंघ, अमरिकसिंघ वासरीकर, शरेसिंघ फौजी, सुरिंदरसिंघ, रणजीतसिंघ कामठेकर, शरणसिंघ सोढी यांची उपस्थिती होती़अधीक्षकपदी गुरविंदरसिंघ वाधवासचखंड गुरुद्वारा बोर्डाचे नवनियुक्त प्रभारी अधीक्षक गुरविंदरसिंघ सुरजितसिंघ वाधवा यांनी आपला पदभार स्वीकारला़ गुरुद्वारा बोर्डाच्या बैठकीत थानसिंघ यांच्या जागी गुरविंदरसिंघ वाधवा यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली होती़ त्यानंतर शनिवारी वाधवा यांनी पदभार स्वीकारला़ त्यानंतर त्यांनी दर्शन घेतले़
नांदेड गुरुद्वारा बोर्डाचा ९६ कोटींचा अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 1:02 AM
येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या २०१८-१९ वित्तीय वर्षासाठीच्या अर्थसंकल्पीय सभेत ९६ कोटींच्या बजेटला मंजुरी देण्यात आली़ गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष आ़तारासिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली़
ठळक मुद्देमुंबईत बैठक : शाळेची इमारत, शिलाई केंद्र यासह इतर विकासकामांसाठी तरतूद