लोकमत न्यूज नेटवर्कनवीन नांदेड : महाराष्टÑ कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नवीन नांदेडातील कामगार कल्याण केंद्रात १२ आॅक्टोबर रोजी दुपारी लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आली असून, या स्पर्धेत नांदेडच्या संघने प्रथम क्रमांक पटकावला.सिडको परिसरातील शिवाजी चौक येथील कामगार कल्याण केंद्रात १२ आॅक्टोबर रोजी झालेल्या लोकनृत्य या स्पर्धेचे उद्घाटन संतोष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.दरम्यान, लोकनृत्य स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विजेत्या संघास सायंकाळी दुसऱ्या सत्रात संपन्न झालेल्या पारितोषिक वितरण सोहळयामध्ये अतिथींच्या हस्ते बक्षीसप्रदान करण्यात आले.बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांची, तर प्रमुख अतिथी म्हणून मनपाचे माजी विरोधी पक्षनेता जीवन पाटील- घोगरे व सिनेअभिनेता अरबाज खान यांची प्रमुख उपस्थिती होती.विशेष म्हणजे, ‘मिसकॉल’ या मराठी चित्रपटाचे अभिनेता अरबाज खान यांची उपस्थिती पारितोषिक वितरण समारंभाचे आकर्षण ठरली.प्रमुख अतिथींच्या हस्ते ‘लोकनृत्य’ या स्पर्धेत सर्वप्रथम येण्याचा मान मिळविलेल्या ललित कलाभवन नांदेडच्या संघास प्रथम बक्षीस प्रदान करण्यात आले. याप्रसंगी या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करणा-या परभणीतील ललित कला भवनच्या संघाला आणि तृतीय क्रमांक पटकाविणाºया सिडको, नांदेड येथील केंद्राच्या संघास मान्यवरांनी पारितोषिक प्रदान केले.सूत्रसंचालन किरण मेंडके यांनी, तर या स्पर्धेचे आयोजक तसेच केंद्र संचालक एस. व्ही. अवचार यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी कामगार कल्याण अधिकारी सी. बी. जाधव, एस.आर. फाळके, व्ही. एन. साखरे, प्रसाद शेळके व साई राठोड यांनी सहकार्य केले. या विविध स्पर्धांना प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कामगार कल्याण मंडळाच्या स्पर्धेत नांदेड प्रथम, परभणी द्वितीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 1:20 AM