शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

'समृद्धी'ला जोडणारा नांदेड-जालना महामार्ग सिमेंटचाच हवा; काम बंद पाडण्याचा चव्हाणांचा इशारा

By प्रसाद आर्वीकर | Published: June 01, 2023 7:30 PM

मराठवाड्यासाठी निकष का बदलला..? माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा इशारा

नांदेड : समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड- जालना द्रुतगती महामार्गाच्या मूळ मंजुरीत कोणताही बदल न करता हा रस्ता सिमेंट काँक्रीटचाच झाला पाहिजे. मराठवाड्यावर असा अन्याय होत राहिला तर रस्त्याचे काम बंद पाडू, असा इशारा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिला आहे.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना अशोकराव चव्हाण यांनी नांदेड- जालना द्रुतगती महामार्गाला मंजुरी दिली होती. या मात्र महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सिमेंट काँक्रिट ऐवजी डांबरी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती अशोकराव चव्हाण यांना समजल्यानंतर त्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिल्या. मूळ आराखड्यात सिमेंट काँक्रिटचाच हा रस्ता व्हावा, अशी मंजुरी आहे. त्यानुसार हा रस्ता सिमेंट काँक्रिटचाच होणे आवश्यक आहे. एमएसआरडीसीचे कार्यकारी संचालक राधेशाम मोपलवार यांच्याशी बोलणे झाले आहे. मूळ मंजुरीत बदल न करता हा महामार्ग सिमेंट काँक्रिटचाच करावा, अशी सूचना केली आहे. डांबरी रस्ते जास्त काळ टिकत नाहीत. एक-दोन वर्षांत खड्डे पडतात. तेव्हा हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा न करता मराठवाड्यावर अन्याय का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

निकष का बदलला..?मराठवाड्यातील जमीन सिमेंट काँक्रिटसाठी अनुकूल नाही, असा निष्कर्ष एमएसआरडीसीने काढला आहे. पण, राष्ट्रीय महामार्ग सिमेंट काँक्रिटचे झालेत. मग याच रस्त्यासाठी निकष का बदलला? असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गNandedनांदेडJalanaजालना