दत्तात्रय कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कमुखेड : पेट्रोलिंग करुन कॅम्पकडे परतत असताना नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट करुन सीआरपीएफच्या जवानावर अंधाधुंद गोळीबार केला़ यात सहापैकी चौघे शहीद झाले़ मात्र त्यानंतरही उर्वरित दोन जवानांनी जखमी अवस्थेत जिवाची बाजी लावून नक्षलवाद्यांशी झुंज दिली़ या दोन जवानांनी दिलेल्या या मुहतोड जबाबामुळे २० ते २५ नक्षली पळून गेले़ ही कामगिरी करणा-या दोघांत मुखेड तालुक्यातील सावरगाव येथील अशोक सिद्धेश्वरे या जवानाचा समावेश होता़ सिद्धेश्वरे यांच्या या कामगिरीचा अवघ्या मुखेड तालुक्याला अभिमान वाटत आहे़बापूराव ऊर्फ अशोक सुभाष सिद्धेश्वरे हे मुखेड तालुक्यातील सावरगाव (पी़) येथील रहिवासी असून सीआरपीएफमध्ये कार्यरत आहेत़ सध्या नक्षली प्रभाव असलेल्या छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यात मुरदंडा येथे ते कर्तव्यावर आहेत.२७ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४़३० च्या सुमारास सिद्धेश्वरे यांच्यासह सीआरपीएफच्या सहा जवानांनी पेट्रोलिंग केली़ त्यानंतर कॅम्पकडे परतत असताना त्यांच्या पथकावर अचानक नक्षल्यांनी हल्ला केला़ यावेळी नक्षल्यांनी आयईडी ब्लास्ट करुन जवानांच्या दिशेने दोन बॉम्ब फेकले़ तसेच अंधाधुंद फायरींग सुरु केली़ या अचानक झालेल्या हल्ल्यात पथकातील मीर माथुर रहेमान (पश्चिम बंगाल), ब्रीज मोहन बहीरा (ओडीसा), एच़सी़प्रवीण आणि डी़जी़श्रीणू (आंध ्रप्रदेश) हे चार जवान शहीद झाले़ तर अशोक सिद्धेश्वरे यांच्यासह त्यांचा आणखी एक साथीदार जबर जखमी झाला़ मात्र जखमी अवस्थेतही सिद्धेश्वरे यांच्यासह त्यांच्या साथीदाराने नक्षल्यांशी झुंज कायम ठेवली़दोन्ही बाजूंनी गोळीबार होत होता़ अखेर या दोन जवानांसमोर हतबल झालेले नक्षली घटनास्थळावरुन पळून गेले़ सिद्धेश्वरे यांच्यासह त्यांच्या साथीदाराने दिलेल्या कडव्या झुंजीमुळे गाडीतील सर्व शस्त्रसाठा सुुरक्षित राहिला़ घटनेनंतर जखमी जवानांना नजीकच्या सीआरपीएफ दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ उपचारादरम्यान छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकाºयांनी रुग्णालयात भेट घेवून अशोक सिद्धेश्वरे यांच्या धाडसी कामगिरीचे कौतुक करुन प्रकृतीची विचारपूस केली़ सध्या सिद्धेश्वरे हे वैद्यकीय रजेवर गावाकडे आले असून, त्यांच्या या कामगिरीचे ग्रामस्थांनाही मोठे कौतुक वाटत आहे़ आ़ तुषार राठोड यांनी सिद्धेश्वरे यांच्या निवासस्थानी जावून प्रकृतीची चौकशी केली़ याबरोबरच राजू घोडके, नागोराव पाटील, सरपंच नारायण चमकुरे, आनंदराव कुलकर्णी, कृष्णाजी कांबळे, माधवराव मुसाडे, संगमेश्वर देवकत्ते, किशारे मस्कले, मगदूम खुरेशी, बाबूराव एटवार, माधव केंद्रे, गजानन साखरे, मल्लिकार्जुन क्यादापुरे आदींनीही सिद्धेश्वरे यांच्या निवासस्थानी जावून त्यांचा गौरव केला़ जवान सिद्धेश्वरे यांनी हिंमतीने नक्षल्यांशी दिलेला लढा कौतुकास्पद असल्याचे गावकºयांनी सांगितले़मृत्यू पाहिला डोळ्यासमोर-अशोक सिद्धेश्वरे२७ आॅक्टोबर रोजी छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील मुलदंडा येथे पेट्रोलिंगचे काम करुन परतत असताना नक्षल्यांनी जीवघेणा हल्ला केला़ या हल्ल्यात माझे चार सहकारी शहीद झाले़ तर मी आणि माझा सहकारी हार्दिक सुरेशकुमार दोघे जबर जखमी झालो़ नक्षल्यांकडून गोळीबार सुरुच होता़ त्याला आम्हीही तितक्याच ताकदीने न डगमगता प्रत्युत्तर दिले़ अखेर २० ते २५ नक्षलवादी तेथून पसार झाले़ हे सारे अवघ्या काही मिनिटांत घडले़ एकप्रकारे स्वत:चा मृत्यूच आम्ही डोळ्याने पाहिला़ जखमी अवस्थेत आम्हाला तातडीने सीआरपीएफच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ आता गावी सुटीवर आलो असून काही दिवस विश्रांती घेणार आहे़
नांदेडच्या जवानाची नक्षल्यांशी झुंज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 12:48 AM
पेट्रोलिंग करुन कॅम्पकडे परतत असताना नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट करुन सीआरपीएफच्या जवानावर अंधाधुंद गोळीबार केला़ यात सहापैकी चौघे शहीद झाले़ मात्र त्यानंतरही उर्वरित दोन जवानांनी जखमी अवस्थेत जिवाची बाजी लावून नक्षलवाद्यांशी झुंज दिली़ या दोन जवानांनी दिलेल्या या मुहतोड जबाबामुळे २० ते २५ नक्षली पळून गेले़
ठळक मुद्देछत्तीसगडमध्ये गाजविली कर्तबगारीसहकाऱ्यांच्या मृत्यूनंतरही जिवाची बाजी लावून दिला लढा