शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शिवसेनेची नांदेड जंबो कार्यकारिणी घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 12:22 AM

महापालिका निवडणुकीपासून रखडलेली शहर कार्यकारिणी व जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांची निवड अखेर शनिवारी घोषित करण्यात आली असून शिवसेनेची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे़ या कार्यकारिणीच्या निवडीनंतर अनेक निष्ठावंतांनी आपल्याला न्याय मिळाला नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे़

ठळक मुद्देसहा उपजिल्हाप्रमुखांसह चार सहसंपर्क प्रमुखांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिका निवडणुकीपासून रखडलेली शहर कार्यकारिणी व जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांची निवड अखेर शनिवारी घोषित करण्यात आली असून शिवसेनेची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे़ या कार्यकारिणीच्या निवडीनंतर अनेक निष्ठावंतांनी आपल्याला न्याय मिळाला नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे़शिवसेनेने जाहीर केलेल्या जंबो कार्यकारिणीत सहा उपजिल्हा प्रमुख असून सात तालुका प्रमुखांचाही समावेश आहे़ नांदेड शहरासाठी एक महानगर प्रमुखासह आठ शहर प्रमुखही देण्यात आले आहेत़ जिल्हा संघटक म्हणून शेख अजमल व दयाल गिरी यांना जबाबदारी दिली आहे़ विधानसभा संघटकपदी सचिन नाईक, विश्वंभर पवार, अवधूत देवसरकर यांची निवड केली आहे़ तर तालुका प्रमुखपदी व्यंकोबा येडे, आकाश रेड्डी, राम ठाकरे, सुदर्शन राठोड, अमोल पवार, संतोष कपाटे, संजय कुरे यांची निवड केली आहे़नांदेड शहराचे महानगर प्रमुख म्हणून अशोक उमरेकर तर शहर प्रमुख म्हणून सचिन किसवे, तुलजेश यादव, निवृत्ती जिंकलवाड यांचा समावेश आहे़ तर जिल्ह्यातील इतर शहर प्रमुख निवडताना पांडुरंग वर्षेवार, माधव वडगावकर, राहुल बेटोळे, प्रकाश दिनवार, मिलिंद पवार यांचा समावेश केला आहे़ तालुका संघटक पदाची जबाबदारी ११ जणांवर सोपवण्यात आली आहे़ त्यामध्ये अशोक मोरे, नवनाथ काकडे, स्वप्नि गारुळे, संजय काईतवाड, नारायण सोळंके, गणेश गिरी, माणिक लोमटे, बालाजी कल्याणकर, राजेश लंगडापुरे, व्यंकट भंडारवार आणि दीपक कन्नलवार यांचा समावेश आहे़ तालुका समन्वयक म्हणून उद्धव शिंदे, मुंजाजी बाºहाटे, हरिभाऊ शेट्टे, डॉ़संजय पवार, परमेश्वर पांचाळ, युवराज पवार, संभाजी पवार, ओमप्रकाश धुप्पेकर, राम कोरडे पाटील आणि अनिल रुणवाल यांच निवड करण्यात आली आहे़

  • नांदेड उत्तरचे शहर समन्वयक म्हणून निखील लातूरकर तर नांदेड दक्षिणचे शहर समन्वयक म्हणून अवतारसिंह पहेरेदार आणि नवीन नांदेडचे शहर समन्वयक राजू कुलथे हे राहणार आहेत़ शहर संघटक पदाचा भार सुरेश आराध्ये, गजानन गंजेवार, रजनीकांत जाधव, गजानन पाळसकर, शरद जैस्वाल, बाळासाहेब देशमुख, मारोती धुमाळ आणि साहेबराव मामीलवाड यांच्यावर राहणार आहे़
  • शिवसेनेच्या या जंबो कार्यकारिणी निवडीनंतर कही खुशी तर कही गम असे वातावरण झाले आहे़ लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जंबो कार्यकारिणी कितपत उपयुक्त ठरेल हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे़

कौडगे, मारावार, पाटील झाले सहसंपर्कप्रमुखया कार्यकारिणीत लोकसभा संघटक म्हणून डॉ़मनोजराज भंडारी यांची निवड केली असून जिल्हा समन्वयक पदी जिल्हाप्रमुख पदावरून पायउतार झालेले बाबुराव कदम यांच्यासह धोंडू पाटील यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे़ सहसंपर्क प्रमुखांच्या रांगेत भूजंग पाटलासह प्रकाश मारावार, रघुवीर मोरे आणि प्रकाश कौडगे यांनाही आणले आले़ उपजिल्हा प्रमुख म्हणून प्रदीप जाधव, गणेश मोरे, दत्ता पांगरीकर, गंगाधर बडुरे, रमेश घंटलवार आणि संजय ढेपे यांना नियुक्ती देण्यात आली आहे़

टॅग्स :NandedनांदेडShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण