शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

नीट परीक्षेत नांदेडचे नाणे खणखणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 12:28 AM

इयत्ता १२ वी परीक्षेत नांदेड जिल्ह्याच्या निकालात यंदा घसघशीत वाढ झाली़ तोच पॅटर्न सोमवारी जाहीर झालेल्या नीट या प्रवेशपूर्व परीक्षेत कायम राहिला़ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एम़बी़बी़एस़ व बी़डी़एस़ या वैद्यकीय पदवीच्या प्रवेशासाठी घेतलेल्या नीट परीक्षेत नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा तर राज्यात पहिला आला़ विशेष म्हणजे, नीटचा निकाल यंदा नांदेडकरांसाठी सुखद धक्का देणारा असून तब्बल १ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मेडिकलला प्रवेश मिळणार आहे़

ठळक मुद्दे१००० विद्यार्थी जाणार मेडिकलला

विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : इयत्ता १२ वी परीक्षेत नांदेड जिल्ह्याच्या निकालात यंदा घसघशीत वाढ झाली़ तोच पॅटर्न सोमवारी जाहीर झालेल्या नीट या प्रवेशपूर्व परीक्षेत कायम राहिला़ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एम़बी़बी़एस़ व बी़डी़एस़ या वैद्यकीय पदवीच्या प्रवेशासाठी घेतलेल्या नीट परीक्षेत नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा तर राज्यात पहिला आला़ विशेष म्हणजे, नीटचा निकाल यंदा नांदेडकरांसाठी सुखद धक्का देणारा असून तब्बल १ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मेडिकलला प्रवेश मिळणार आहे़३१ मे रोजी इयत्ता १२ वी चा निकाल घोषित झाला़ या निकालात जिल्ह्याची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले़ तब्बल ८९़३४ टक्के विद्यार्थी १२ वीत उत्तीर्ण झाले़ मागील वर्षी हाच निकाल ८८़५४ टक्के तर २०१६ मध्ये ८४़९९ टक्के इतका होता़ १२ वी निकालाची टक्केवारी पाहता यावर्षीच्या निकालात ०़०८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले़ त्यातही विज्ञान शाखेचा ९६़१५ टक्के आणि वाणिज्य शाखेचा ९५़५१ टक्के इतका राहिला़ गुणवत्तावाढीची ही परंपरा नीट परीक्षेच्या निकालातही नांदेडने राखली़ नीटसाठी देशभरातून १३ लाख २६ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती़ यात ७२० पैकी ६८५ गुण मिळवत नांदेडच्या कृष्णा अग्रवालने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला़ विशेष म्हणजे, लातूरचा टॉपर यावर्षी ६४० गुणांचा असताना नांदेडच्या अग्रवालने ६८५ गुण मिळवित लातूरला मागे सारले़ ६०० पेक्षा अधिक गुण मिळविणारेही २० विद्यार्थी आहेत़ ७२० पैकी ३६० गुण बायोलॉजीचे असतात़ त्यामुळे बायोलॉजीच्या गुणाला नीट परीक्षेत विशेष महत्त्व असते़ यातही अग्रवालने ३६० पैकी ३५० गुण मिळविले़विशेष म्हणजे, नांदेडमधील ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी बायोलॉजीत ३०० हून अधिक गुण मिळविले आहेत़ मागील वर्षीच्या नीट परीक्षेचा नांदेडचा निकाल पाहता यंदा तो चांगलाच वधारल्याचे दिसून येते़ महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशाच्या अडीच हजार जागा आहेत़ नांदेडमधून ७४५ विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी पात्र ठरले होते़ यंदा नांदेडचा निकाल अधिक सरस लागल्याने हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे़----यंदा कटआॅफ घसरलानीट परीक्षेचा यंदाचा निकाल देशभरात घसरला असला तरी नांदेडसाठी तो सुखद धक्का देणारा आहे़ यंदा कटआॅफ घसरला आहे़ खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्के म्हणजेच ७२० पैकी ११९ मार्क्स असा राहील़ मागच्यावर्षी हा कटआॅफ १३१ एवढा होता़ तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा कटआॅफ ४० टक्के म्हणजे ७२० पैकी ९६ मार्क्स असणार आहे़ जो मागीलवर्षी १०७ एवढा होता़ निकालानुसार ७ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी कौन्सिलिंग राऊंडसाठी पात्र ठरले आहेत़- दशरथ पाटीलसंचालक, आय़आय़बी़प्रा़लि.----६०० हून अधिक गुण घेणारे विद्यार्थीनीट परीक्षेत नांदेडने गुणवत्तेचा झेंडा फडकविला आहे़ राज्यात अव्वल स्थान पटकावितानाच तब्बल २० विद्यार्थ्यांनी ६०० हून अधिक गुण मिळविले आहेत़ यात कृष्णा अग्रवाल (६८५), तेजस्विनी बनबरे (६६५), प्रशांत वायाळ (६६१), अभिजित कदम (६५५), रोहित गट्टानी (६५०), सत्यम मंटे (६४५), फय्याज बागवान (६३०), मृदुला भालके (६३३), प्रज्वल तमडी (६२७), आर्या देशमुख (६२३), प्रतिकेश सरनाईक (६२०), विजय हंगे (६२०), तुषार भोसले (६१५), प्रतिभा जनागोंडा (६१५), स्वप्निल देलमाडे (६११), श्रेयश चांडक (६०८), अभय पुरी (६०५), ऋषिकेश जोशी (६०५),मयुर बावनकर (६०२), वैष्णवी कुसुमकर (६०१)

टॅग्स :NandedनांदेडNEET Result 2018नीट परीक्षा निकाल २०१८Studentविद्यार्थी