काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसचा पारंपारिक गड म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघात मागील निवडणुकीत मोदी लाटेतही कॉंग्रेसचे अशोक चव्हाण ८१४५५ च्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. काँग्रेस ही जागा पुन्हा राखते की वंचित बहुजन आघाडीमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा भाजपाला मिळतो याची उत्सुकता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या पोस्टल फेरीनंतर अशोक चव्हाण यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना ६५० मतं मिळाली असून यांच्या प्रताप पाटील चिखलीकर पारड्यात ३५० मतं पडली आहेत
नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण . मतदार १७ लाख, १७ हजार, ८२५ एवढे असून यंदाच्या निवडणुकीत ६५.१५ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या अशोक चव्हाण यांचा ४ लाख ९३ हजार ७५ मतांसह विजय साकारला होता, तर भाजपा उमेदवार डी. बी. पाटील यांना ४ लाख ११ हजार ६२० मतं मिळाली होती.