शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

नांदेड लोकसभा : पहिल्या दिवशी एकच अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:43 AM

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी नांदेड मतदारसंघात एकमेव अर्ज भरण्यात आला आहे. त्याचवेळी ५१ इच्छुकांनी ९३ अर्ज नेल्याची माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : ५१ इच्छुकांनी नेले ९३ उमेदवारी अर्ज

नांदेड : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी नांदेड मतदारसंघात एकमेव अर्ज भरण्यात आला आहे. त्याचवेळी ५१ इच्छुकांनी ९३ अर्ज नेल्याची माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली.दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी १९ मार्चपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे पहिल्या दिवशी पठाण जफर अलीखान महेमुद अलीखान यांनी अर्ज दाखल केला आहे. ९३ अर्ज निवडणूक विभागातून ५१ इच्छुकांनी नेले आहेत.लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय अर्थात जिल्हाधिकारी कार्यालय येथे नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवारांची गैरसोय तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, या दृष्टीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय ते महापालिकेपर्यंतचा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या वेळेत हा रस्ता २६ मार्च पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. सार्वजनिक सुटीच्या दिवशी मात्र तो सुरू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या कालावधीत श्याम टॉकीज ते चिखलवाडीकडे जाणाºया वाहनांना शिवाजी महाराज पुतळ्यासमोरुन पोस्ट आॅफिस, न्यायालयाच्या मागील रस्त्याने चिखलवाडीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.दरम्यान, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनुराधा ढालकरी यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक तयारी संदर्भातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देवून नांदेड-उत्तर विधानसभा मतदारसंघात ३ लाख ७ हजार मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड उत्तर मतदारसंघात ३१ झोन स्थापन करण्यात आले असून ९ भरारी पथके कार्यान्वित करण्यात आले आहेत. नांदेड उत्तर विभागात ३३६ मतदान केंद्र आहेत. १४०० पेक्षा अधिक मतदारसंख्या असल्याने १० सहायक मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राजकीय पक्षांना विविध परवानग्यांसाठी एक खिडकीही सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, पंचायत समिती, महापालिका तसेच नायब तहसीलदार हे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात जवळपास अडीच हजार अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना २६ मार्च रोजी पहिले प्रशिक्षण आणि ८ एप्रिल रोजी दुसरे प्रशिक्षण दिले जाणार आहे.नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श मतदान केंद्राची स्थापना केली जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. दिव्यांग मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. दिव्यांग मतदारांसाठी यावर्षीही सुलभ निवडणूक राहील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी यांची उपस्थिती होती.

टॅग्स :NandedनांदेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस