लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांना आयुक्त लहुराज माळी यांनी विभागांचे वाटप केले असून या विभाग वाटपात राज्यसेवेतील अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले आहे. त्याचवेळी स्थानिक सहायक आयुक्तांना मात्र महत्त्वाचे विभाग देण्यात आले नसल्याने स्थानिक अधिकाºयांमध्ये मात्र नाराजीची भावना पसरली आहे.महापालिकेत कार्यरत असलेले एकमेव उपायुक्त रत्नाकर वाघमारे हे ३१ जुलै रोजी स्वेच्छानिवृत्त झाले. त्यामुळे महापालिकेत आता एकही मूळ उपायुक्त पदावरील अधिकारी उरला नाही. त्यामुळे आहे, त्या सहाय्यक आयुक्त आणि इतर विभागातील अधिकाºयांना उपायुक्तपदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. आयुक्त माळी यांनी ३१ जुलै रोजी विभाग वाटपाचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामध्ये लेखाधिकारी असलेल्या संतोष कंदेवार यांना उपायुक्त विकास विभाग सोपवण्यात आला आहे. त्याअंतर्गत अमृत योजना, बीएसयुपी योजना, पंतप्रधान आवास योजना, नगरोत्थान विभाग, पाणीपुरवठा व मलनि:स्सारण विभाग, सार्वजनिक बांधकाम, कर विभाग, मालमत्ता विभाग आणि भांडार विभाग सोपविला आहे. नुकत्याच नांदेड महापालिकेत रुजू झालेल्या सहाय्यक आयुक्त गीता ठाकरे यांनाही उपायुक्तपदाचा पदभार देताना उपायुक्त प्रशासन म्हणून सामान्य प्रशासन विभाग, आस्थापना विभाग, नगररचना विभाग, स्वच्छता विभाग, शिक्षण विभाग, स्टेडियम व क्रीडा विभाग, जनगणना विभाग, भूसंपादन विभाग, ग्रंथालय विभाग, उड्डाण विभाग, पशुसंवर्धन विभाग, अभिलेख विभाग व स्वच्छ महाराष्ट्र अभियान विभागाचा पदभार सोपविला आहे. सहायक आयुक्त म्हणून परिविक्षाधिन कालावधीत महापालिकेत रुजू झालेल्या माधवी मारकड यांना यापूर्वीच उपायुक्त पदाचा पदभार दिला आहे. त्यांच्या विभागात आता बदल करण्यात आले आहेत. क्षेत्रीय कार्यालये, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विभाग, स्थानिक संस्था कर विभाग, संगणक व ई-गव्हर्नस, जनसंपर्क विभाग, अग्निशमन विभाग, एनयूएलएम विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग व निवडणूक विभाग नव्याने सोपविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सहायक आयुक्त असलेल्या गीता ठाकरे आणि माधवी मारकड यांचा मूळ पदभारही आदेशात उल्लेखित केला आहे. ठाकरे यांच्याकडे पाणीकर वसुली आणि बीएसयुपी तर मारकड यांच्याकडे कर विभाग, सामान्य प्रशासन विभाग व आस्थापना विभाग असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहेत.या अधिकाºयांनी दैनंदिन कामकाज करताना वित्तीय व प्रशासकीय अधिकारांच्या मर्यादेत राहूनच काम पहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. वित्तीय प्रकरणांसाठी मुख्य लेखा परीक्षकांची मान्यता घ्यावी. सर्वसाधारण सभा तसेच केंद्र व राज्य शासनाकडे पाठवावयाचे सर्व प्रस्ताव आयुक्तांच्या पूर्वमान्यतेने व मंजुरीनेच पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे.---स्थानिक सहायक आयुक्त बेदखलमहापालिकेत असलेल्या स्थानिक सहायक आयुक्त ३१ जुुलैच्या आदेशानंतर बेदखल झाले आहेत. त्यांना कोणतेही महत्त्वाचे विभाग सोपवले नसून प्रामुख्याने क्षेत्रीय कार्यालयांचा पदभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आतापर्यंत स्थानिक सहायक आयुक्तांना अनेक महत्त्वाचे पदभार सोपवले होते. आयुक्त माळी यांनी मात्र स्थानिकावर जणू अविश्वासच दाखविल्याचे ३१ जुलैच्या आदेशानुसार स्पष्ट होत आहे. याबाबत अनेक अधिकाºयांमध्ये असंतोषही निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिकेचा कारभार कसा चालतो, याबाबत उत्सुकता आहे.
नांदेड मनपात नवे गडी, नवे राज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 12:27 AM
महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांना आयुक्त लहुराज माळी यांनी विभागांचे वाटप केले असून या विभाग वाटपात राज्यसेवेतील अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले आहे. त्याचवेळी स्थानिक सहायक आयुक्तांना मात्र महत्त्वाचे विभाग देण्यात आले नसल्याने स्थानिक अधिकाºयांमध्ये मात्र नाराजीची भावना पसरली आहे.
ठळक मुद्देआयुक्तांनी केले विभागांचे फेरनियोजन