नांदेड: गत चार-पाच दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असून सकाळी आठ वाजेपासून उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. मंगळवारी नांदेडचेतापमान ३८ अशांवर पोहचले होते़ त्यामुळे नांदेडकर घामाघूम झाले होते़जिल्हा परिषद हायस्कूलचे केंद्र संचालक बालासाहेब कच्छवे म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात तापमान जेमतेम असले तरी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे.२० फेब्रुवारी रोजी कमाल तापमान ३७.० अंशसेल्सिअस तर आर्द्रता ६२, २१ रोजी कमाल ३८.०, तर आर्द्रता ६१, २२ रोजी कमाल ३७.० तर आर्द्रता ४४, २३ कमाल ३८.० तर आर्द्रता ५६, २४ रोजी कमाल ३८.५ तर आर्द्रता ५२, २५ रोजी कमाल ३८.५ तर आर्द्रता ४९ तर २६ फेब्रुवारी रोजी कमाल तापमान ३८.० अंशसेल्सिअस तर आर्द्रता ५० टक्के होती. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच वयोवृद्ध व लहान मुलांना ऊन असह्य होत आहे़ दुसरीकडे थंडपेयांना मागणी वाढली आहे़ कुलर आणि इतर वातानुकुलित यंत्रांच्या मागणीतही अचानक वाढ झाली. दिवसभर कडक उन्हानंतर पहाटेच्या वेळी वातावरणात गारवा जाणवत आहे़ बदललेल्या वातावरणामुळे साथीचे रोग पसरण्याचीही दाट शक्यता आहे़ पाणीदार फळांची दुकानेही नांदेडात सजली आहेत़
नांदेडचा पारा ३८ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:37 AM