शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नांदेड महापालिकेचा मालमत्ता कराचा लाखाचा आकडा कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:40 AM

महापालिका स्थापनेनंतर मालमत्ताधारकांच्या सामान्य करात दिवसेंदिवस वाढ होत गेली असून १९८०-८१ मध्ये मालमत्ताकराची १९ लाख ६९ हजार रुपयांची एकूण मागणी असलेल्या महापालिकेची २०१७-१८ ची मालमत्ताकराची मागणी १८ कोटी ९१ लाखांवर पोहोचली आहे. शहरात सध्या जीआयएस कंपनीकडून मालमत्तांचे मूल्यांकन केले जात असून करामध्ये जवळपास ४० टक्के वाढ अपेक्षित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिका स्थापनेनंतर मालमत्ताधारकांच्या सामान्य करात दिवसेंदिवस वाढ होत गेली असून १९८०-८१ मध्ये मालमत्ताकराची १९ लाख ६९ हजार रुपयांची एकूण मागणी असलेल्या महापालिकेची २०१७-१८ ची मालमत्ताकराची मागणी १८ कोटी ९१ लाखांवर पोहोचली आहे. शहरात सध्या जीआयएस कंपनीकडून मालमत्तांचे मूल्यांकन केले जात असून करामध्ये जवळपास ४० टक्के वाढ अपेक्षित आहे.शहरात आजघडीला १ लाख ११ हजार मालमत्ताधारक आहेत. या मालमताधारकांकडून १८ कोटी ९१ लाख रुपये सामान्य कराची मागणी महापालिकेकडून करण्यात आली आहे. शहरात सध्या फेरमूल्यांकनाचे काम महापालिकेने हाती घेतले असून जीआयएसकडून हे केले जात आहे. शहरात प्रतिदिन १ ते दीड हजार मालमत्ताचे मूल्यांकन केले जात आहे. या मूल्यांकनानंतर मालमत्तधारकांना कराच्या नोटीस बजावल्या जाणार आहेत.महापालिका स्थापनेच्या प्रारंभी १९८०-८१ मध्ये शहरात २२ हजार १६८ मालमत्ता होत्या. त्यांच्याकडून १९ लाख ६९ हजार रुपये कर अपेक्षित होता. त्यानंतर शहरात मालमत्तेचे मूल्यांकनही १९८६-८७ मध्ये करण्यात आले. या मूल्यांकनानंतर शहरातील मालमत्ताची संख्या ही २६ हजार १९५ वर पोहोचली. त्यांच्याकडून ४८ लाख ९३ हजार रुपये मालमत्ताकराची मागणी करण्यात आली. १९९०-९१ मध्ये तिसरे फेरमूल्यांकन झाले. या मूल्यांकनात ६ हजार मालमत्तांची वाढ झाली. ३२ हजार २९७ मालमत्तांसाठी ७१ लाख ५ हजारांची सामान्य कर मागणी करण्यात आली होती. ९६-९७ मध्ये मालमत्ताधारकांकडून सामान्य करापोटी वसूल करण्यात आलेल्या रकमेची संख्याही १ कोटींच्या पुढे गेली. ३९ हजार ४२८ मालमत्ताधारकांकडून १ कोटी ८३ लाख ४९ हजार रुपये कर वसुली करण्यात आली. २००५-६ मध्येही फेर मूल्यांकन करण्यात आले. ६५ हजार २३३ मालमत्तांसाठी ६ कोटी ८४ लाख ९२ हजार आणि २०११-१२ मध्ये झालेल्या मूल्यांकनात मालमत्तांधारकांची संख्या ९७ हजार ९५९ वर पोहोचली. या मालमत्ताधारकांकडून १५ कोटी १० लाख ५८ हजार रुपये कराची मागणी करण्यात आली.२०११-१२ नंतर आता शहरात सातव्यांदा फेरमूल्यांकन करण्यात येत आहे.या फेरमूल्यांकनात करामध्ये निश्चितपणे वाढ होणार आहे. ही वाढ नेमकी किती होईल, ते आता मालमताकरांच्या नोटीस हाती पडल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. रेडी रेकनर दरानुसार करवाढ केली तर ती मोठी वाढ ठरणार आहे. महापालिकेला ४० टक्क्यांपर्यंत करवाढ करण्याचे अधिकार आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता महापालिकेने सुचविलेल्या करवाढीला सत्ताधारी कितपत स्वीकारतील, हेही आगामी काळात स्पष्ट होणार आहे.---कर वसुलीत उत्कृष्ट काम; १३ कोटींचा विशेष निधीनांदेड महापालिकेने कर वसुलीत उत्कृष्ट काम केल्यामुळे महापालिकेला राज्य शासनाने १३ कोटींचा विशेष निधी दिला आहे. २०१४-१५ आणि २०१५-१६ मध्ये कर वसुलीसंदर्भात झालेल्या उत्कृष्ट कामाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली होती. गुरु-त्ता-गद्दीनंतर शहरातील विकासकामे निधीअभावी रखडली आहेत. महापालिकेचे आर्थिक स्त्रोत दिवसेंदिवस कमी होत आहेत.आता महापालिकेला कर वसुलीशिवाय अन्य कोणताही मोठा स्त्रोत उरला नाही. परिणामी महापालिका प्रशासनाने कर वसुलीसाठी आपला मोर्चा वळविला आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाTaxकर