नांदेड : महापालिकेत पुन्हा एकदा बदल्यांचा हंगाम सुरू झाला असून अतिरिक्त पदभारांची खैरात वाटप केली जात आहे. ११ डिसेंबर रोजी सहा बदल्यांचे आदेश आयुक्तांनी काढले आहे.
भांडार अधीक्षक असलेल्या सध्या तरोडा क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार असलेल्या विलास मठपल्लेवार यांचा पदभार काढून पुन्हा एकदा त्यांना भांडार अधीक्षक पदी नेमले आहे. क्षेत्रीय कार्यालय अशोकनगरचे गौतम कवडे यांना पुन्हा एकदा आयुक्तांचे स्वीय सहायक म्हणून घेण्यात आले आहे. त्याचवेळी अनधिकृत बांधकाम विभागाचे ते प्रभारी सहायक आयुक्त म्हणूनही काम पाहणार आहेत. मुळचे वरिष्ठ लिपिक असलेले मल्हार मोरे यांना शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार दिला होता. तो बदलून आत अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयात कार्यालय अधीक्षक म्हणून नेमले आहे. उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरहत उल्ला बेग यांना तरोडा, सांगवी क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुळचे जकात अधीक्षक असलेले संभाजी कास्टेवाड यांना अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी म्हणून नेमणूक दिली आहे. प्रभारी मालमत्ता व्यवस्थापक असलेल्या राजेश चव्हाण यांना आता शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार देण्यात आला आहे तर त्यांच्याकडील मालमत्ता व्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार हा उपायुक्त अजितपाल संधू यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सध्या महापालिकेत बदल्यांचा हंगाम असल्याचे स्पष्ट होत आहे. मुळ पदावरील अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने आणि शासनाकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती न झाल्याने सध्या महापालिकेत प्रभारी कारभार सुरू आहे.
पात्रतेकडे कानाडोळा करून पदभाराचंी खैरातहा कारभार देताना पात्रतेच्या निकषालाही डावलले जात आहे. ज्या शैक्षणिक पात्रतेच्या कारणामुळे प्रारंभी क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा पदभार देण्यास नकार दिला होता त्याच पात्रतेकडे आता कानाडोळा करुन पदभाराची खैरात वाटप केली जात आहे. या सर्व बदल्या व पदभाराची खैरात ही पूर्णपणे राजकीय दबावातून व एकहाती सत्तेचा परिणाम असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. सध्या महापालिकेत बदल्यांचा हंगाम असल्याचे दिसत असून मूळ पदावरील अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने तसेच शासनाकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती न झाल्याने महापालिकेत प्रभारीराज सुरू आहे़ क्षेत्रीय कार्यालय अशोकनगरचे गौतम कवडे यांना पुन्हा एकदा आयुक्तांचे स्वीय सहायक म्हणून घेतले आहे. ते अनधिकृत बांधकाम विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त म्हणूनही काम पाहतील. वरिष्ठ लिपिक मल्हार मोरे यांना शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार दिला होता. तो बदलून आता अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयात कार्यालय अधीक्षक म्हणून नेमले आहे. उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरहत उल्ला बेग यांना तरोडा, सांगवी क्षत्रिय कार्यालयाची जबाबदारी दिली़