शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

नांदेड महापालिकेच्या आठ नगरसेवकांचे पद धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 12:46 AM

महापालिकेच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या नगरसेवकांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते़ परंतु याबाबत वारंवार सूचना देवूनही काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी अद्यापही जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेच नाही़

ठळक मुद्दे११ एप्रिलपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र सादर करा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या नगरसेवकांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते़ परंतु याबाबत वारंवार सूचना देवूनही काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी अद्यापही जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेच नाही़ त्यामुळे या आठ जणांचे नगरसेवक पद धोक्यात आले असून त्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ११ एप्रिलची अंतिम मुदत देण्यात आली आहे़महापालिका निवडणुकीत एकूण ३९ उमेदवार राखीव जागांवर निवडून आले आहेत़ त्यापैकी १५ नगरसेवकांनी आपले जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते़ प्रशासनाने याबाबत त्यांना सूचना दिल्यानंतर ७ नगरसेवकांनी आपले जातवैधता प्रमाणपत्र सादर केले़ तर आठ नगरसेवकांनी अद्यापही हे प्रमाणपत्र सादर केले नाही़ महापालिका निवडणूक होवून सहा महिन्यांचा कालावधी आता संपत आला आहे़याबाबत वारंवार सूचना देवूनही आठ नगरसेवकांनी अद्यापपर्यंत मनपा प्रशासनाकडे जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले़ या सर्व नगरसेवकांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता ११ एप्रिलची अंतिम मुदत देण्यात आली असल्याचे देशमुख म्हणाले़या मुदतीत नगरसेवकांनी प्रमाणपत्र सादर न केल्यास १२ एप्रिल रोजी तसा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे़ या आठ नगरसेवकांमध्ये सुनंदा पाटील, सरिता बिरकले, शैलजा स्वामी, राजेश यन्नम, दुष्यंत सोनाळे, अल्का शहाणे, शोएब हुसेन, शांता गोरे या आठ जणांचा समावेश आहे़ सध्यातरी या नगरसेवकांवर पद जाण्याची टांगती तलवार कायम आहे़

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाCaste certificateजात प्रमाणपत्रcongressकाँग्रेस