लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहराला पडलेल्या डेंग्यूच्या विळख्याचे चित्र ‘लोकमत’ने पुढे आणल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेनंतर आता महापालिकेचे पदाधिकारीही गंभीर झाले असून बुधवारी आयुक्तांनी आढावा गुरुवारी स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला यांनी डेंग्युसंदर्भात आरोग्य विभागाची बैठक घेतली. यावेळी आयुक्त माळी यांच्यासह नगरसेवकांचीही उपस्थिती होती.शहरात आॅगस्टमध्ये १८ तर सप्टेंबर महिन्यात डेंग्युचे ९ रुग्ण आढळले आहेत. अनेकांना डेंग्युचे लागण झाले असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. शासकीय आकडेवारी ही कमी असली तरीही प्रत्यक्षात संशयित रुग्णांची संंख्या मोठी आहे. याबाबत महापालिकेच्या उपाययोजना मात्र तोकड्या ठरत आहेत. परिणामी डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. शहराची लोकसंख्या पाहता आरोग्य कर्मचाºयांची संख्या बोटावर मोजण्याएवढीच आहे. शहराला १२५ कर्मचाºयांची गरज असताना केवळ ३२ कर्मचा-यावर कार्यभार भागवला जात आहे. याबाबत सभापती शमीम अब्दुल्ला यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त लहुराज माळी यांचीही उपस्थिती होती. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सविता चव्हाण यांनी शहरातील डेंग्यु परिस्थितीबाबत माहिती दिली. कुठलीही गंभीर परिस्थिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर हा कालावधी हा डेंग्यु साथीसाठी पोषक असतो. खबरदारी घेतल्यापासून डेंग्युला दूर सारता येते. आरोग्य विभागाकडून २५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत ३५४ घरामध्ये कंटेनर सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये ६४१ कंटेनर तपासणी करण्यात आली. त्यात २७ कंटेनर दुषित आढळले. हे सर्व कंटेनर रिकामे करुन कोरडे ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.त्याचवेळी विणकर कॉलनी, चौफाळा भागातील डॉ. भोपळे यांच्या रुग्णालयात दाखल ६ डेंग्यु संशयित रुग्णांपैकी आर्यन तालकोकुलवार (वय १३), श्वेता कोकुलवार (वय १३), सय्यद परवेझ (वय १८) या रुग्णांचे रक्तजल नमुने शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. एका रुग्णाने नमुना देण्यास नकार दिला. चार रुग्ण उपचारानंतर घरी परतले असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले. २७ सप्टेंबर रोजी महेश मामिडवार या संशयित रुग्णाचे रक्तजल नमुने घेण्यात आले आहेत. सदर रुग्णाच्या घरी व परिसरात नागरी हिवताप योजना कार्यालयाच्या पथकाने भेट देवून अळीनाशक औषधी फवारणी व धूर फवारणी केली आहे.शहरात आरोग्य कर्मचा-यांमार्फत ताप रुग्ण सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. तापीच्या रुग्णापैकी आठ रक्तनमुने घेण्यात आले आहेत. तसेच खाजगी रुग्णालय, पॅथॉलॉजी लॅब यांना डेंग्यु संशयित रुग्णांची माहिती मनपा आरोग्य विभागाला त्वरित देण्याचे आदेशही दिले आहेत. आयुक्त माळी यांनी सांगितले, फवारणी कर्मचा-यांची संख्या वाढवण्यात येईल. आरोग्य विभागाकडून केल्या जाणा-या उपाययोजनांसाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीस नगरसेवक उमेश चव्हाण, सय्यद शेरअली, राजेश यन्नम, अ. फयुम, नागनाथ गड्डम, अ. लतिफ, साबेर चाऊस आदी उपस्थित होते़एकच फॉगिंग मशिनसहा झोन असलेल्या नांदेड शहरासाठी केवळ एकच फॉगिंग मशिन धूर फवारणीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे ही एकच मशिन कोण-कोणत्या भागात फॉगिंग करीत असेल? हा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेकडे एकूण तीन फॉगिंग मशिन उपलब्ध आहेत. त्यातील दोन मशिन बंद पडल्या आहेत. ऐन साथीच्या काळात तरी त्या मशिन सुरू राहतील याची खबरदारी घेणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दूर्लक्ष होत आहे़शाळांमध्ये पोहोंचणारडेंग्युच्या वाढत्या साथीबाबत जनजागृती करण्यासाठी शाळांमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी पोहचणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांमार्फत डेंग्यु प्रतिबंधात्मक जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येवू शकते. डेंग्युच्या रुग्णांची संख्या पाहता शालेय मुलामध्ये ही संख्या जादा असल्याचे पुढे आले आहे.
नांदेड मनपाच्या ‘आरोग्य’ची यंत्रणा तोकडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 1:08 AM
शहराला पडलेल्या डेंग्यूच्या विळख्याचे चित्र ‘लोकमत’ने पुढे आणल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेनंतर आता महापालिकेचे पदाधिकारीही गंभीर झाले असून बुधवारी आयुक्तांनी आढावा गुरुवारी स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला यांनी डेंग्युसंदर्भात आरोग्य विभागाची बैठक घेतली. यावेळी आयुक्त माळी यांच्यासह नगरसेवकांचीही उपस्थिती होती.
ठळक मुद्देसभापतींनी घेतली तातडीची आढावा बैठक;३२ कर्मचाऱ्यांवर कारभार