मध्य रेल्वेने कळविल्यानुसार नांदेड रेल्वे विभागातील नांदेड-पनवेल ही विशेष गाडी ३० जून २०२१ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
यामध्ये गाडी संख्या ०७६१४ नांदेड ते पनवेल विशेष गाडी दिनांक १६ जून ते ३० जून २०२१ दरम्यान तर गाडी संख्या ०७६१३ पनवेल ते नांदेड विशेष गाडी दिनांक १७ जून ते १ जुलै, २०२१ दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
काही रेल्वे रद्द , ओखा-रामेश्वरम विशेष गाडीस मुदत वाढ
नांदेड विभागातून धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे :
रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
गाडी संख्या ०७६६५ परभणी ते नांदेड १८ जून ते १७ जुलै या कालावधीत रद्द करण्यात आली आहे. नांदेड ते पनवेल (०७६१४) ही गाडी १६ जून ते ३० जून या कालावधीत तर गाडी संख्या ०७६१३ पनवेल ते नांदेड १७ जून ते १ जुलै या कालावधीत पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
गाडी संख्या ०७६९१ नांदेड ते तांदूर १६ जून ते १५ जुलै या कालावधीत सिकंदराबाद ते तांदूर दरम्यान रद्द राहील. गाडी संख्या ०७६९२ तांदूर ते परभणी ही गाडी १७ जून ते १६ जुलै या कालावधीत तांदूर ते सिकंदराबाद आणि नांदेड ते परभणी दरम्यान रद्द
या गाड्यांना मुदत वाढ
गाडी संख्या ०६७३३ रामेश्वरम ते ओखा या गाडीला २ जुलै ते ५ नोव्हेंबर पर्यंत तर गाडी संख्या ०६७३४ ओखा ते रामेश्वरम ६ जुलै ते ९ नोव्हेंबर या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे.