नांदेड : महापालिकेची सध्या शहरात करवसुली मोहिम जोरात सुरु आहे़ कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांच्या विरोधात कारवाईही करण्यात येत आहे़ त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयाचा पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला़ या कार्यालयाकडे महापालिकेची तब्बल ९ कोटी ३२ लाख रुपयांची थकबाकी होती़महापालिकेपुढे सध्या थकीत कर वसुलीचे मोठे आव्हान आहे़ करवसुलीसाठी महापालिकेने विविध पथकांची स्थापना केली आहे़ त्याचबरोबर वेळेत कर भरणाऱ्यांना सवलतही देण्यात येत आहे़ तर कर थकीत ठेवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे़ त्याप्रमाणेच महापालिकेच्या हद्दीतील दक्षिण मध्य रेल्वेच्यानांदेड रेल्वेस्टेशन, माळटेकडी स्टेशन व दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयाला मनपाकडून विविध सोयी पुरविण्यात येतात़ त्या सेवा करापोटी व पाणी कराचे जवळपास ९ कोटी ३२ लाख रुपये थकीत आहेत़ महापालिकेच्या वतीने या थकीत करासाठी रेल्वे विभागाकडे अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला़ परंतु डीआरएम कार्यालयाकडून या थकीत कराचा भरणा करण्यात आला नाही़ त्यामुळे गुरुवारी महापालिकेने डीआरएम कार्यालयाच्या जलवाहिनीचा वॉल्व बंद करुन पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला़यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त अजितपालसिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सदाशिव पतंगे, मिर्झा फरहतउल्ला बेग, कुमार कुलकर्णी, सुधीर इंगोले, विलास पांचाळ, राजेश चव्हाण, बोधनकर, बळीराम एंगड, ढगे, राजू जोरवर, सादुल्ला खान यांनी ही कारवाई केली़ या कारवाईमुळे रेल्वेपुढे आता पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार आहे़
नांदेड रेल्वे कार्यालयाचा पाणीपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:48 AM
महापालिकेची सध्या शहरात करवसुली मोहिम जोरात सुरु आहे़ कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांच्या विरोधात कारवाईही करण्यात येत आहे़
ठळक मुद्देमनपाची कारवाई ९ कोटी ३२ लाखांचा थकला कर