लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदी मोहिमेत दुसºया दिवशी १ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गुरुवारीही महापालिका आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्यावतीने संयुक्तपणे प्लास्टिक वापरणा-या व्यापा-याविरुद्ध कारवाई करण्यात आली.प्लास्टिक बंदी असतानाही प्लास्टिकचा वापर सुरूच असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे आयुक्त माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ३ आॅक्टोबर पासून शहरात प्लास्टिक बंदी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही सहभागी झाले आहेत. या पथकाने शहरातील वर्कशॉप ते श्रीनगर येथील १९२ दुकानांची तपासणी केली. त्यावेळी २८ जणांकडे बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर होत असल्याची बाब उघड झाली.त्यापैकी २७ दुकानदाराकडून प्रत्येकी ५ हजार रुपये या प्रमाणे १ लाख ३५ हजार रुपये तर एका दुकानदाराकडून दुस-यांदा प्लास्टिकचा वापर झाल्यामुळे एक हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणा-या दोन जणांना प्रत्येकी दीडशे रुपये असा दंड वसूल करण्यात आला. गुरुवारी महापालिकेच्या पथकाने १ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. जवळपास एक क्विंटल प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला.या कारवाईत प्रदुषण नियंत्रण मंडळाचे राकेश धपाळे, पंकज बावणे, सचिन हारबड, महापालिकेचे सहायक आयुक्त गुलाम सादिक, क्षेत्रिय अधिकारी अविनाश अटकोरे, संजय जाधव, सुधीर इंगोले, शिवाजी डहाळे, डॉ. मिर्झा बेग, पंडीत जाधव, मनपा पोलिस पथक स्वच्छता निरीक्षक आदींचा सहभाग होता.विरोधी पक्षनेत्याकडून कारवाईस स्थगितीची मागणीमहापाीिलकेने ऐन सणासुदीच्या काळात प्लास्टिक बंदी मोहीम हाती घेतली आहे. प्लास्टिक बंदी संदर्भात नागरिकांमध्ये अद्यापही संभ्रम आहे. कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे आणि कोणत्या नाही याबाबत नेमकी माहिती नाही. त्यामुळे या प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. असे न करताच महापालिका दंडात्मक कारवाई करत आहे. सध्या दसरा, दिवाळीची तयारी नागरिकांसह व्यापारीही करीत आहेत. त्यात जी दंडात्मक मोहीम सुरू केल्याने अनेकांना फटका बसत आहे. मनपाने कॅरीबॅगचे घाऊक व किरकोळ विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाई करावी मात्र सामान्य नागरिकांना वेठीस धरु नये, अशी मागणी विरोधी पक्ष नेत्या गुरप्रितकौर सोडी यांनी केली आहे. सणासुदीच्या कालावधीत या मोहिमेला तात्पुरती स्थगिती द्यावी, प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करुन कारवाई करावी, अशी मागणीही गुरप्रितकौर सोडी यांनी केली आहे.
नांदेडात दुसऱ्यादिवशी दीड लाखांचा दंड वसुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 12:35 AM
महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदी मोहिमेत दुसºया दिवशी १ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गुरुवारीही महापालिका आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्यावतीने संयुक्तपणे प्लास्टिक वापरणाºया व्यापाºयाविरुद्ध कारवाई करण्यात आली.
ठळक मुद्दे१९२ दुकानांची तपासणी, २८ दुकानांना दंड