लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथे ६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यासाठी नांदेड जिल्ह्यातून १४ हजार कार्यकर्ते जाणार असल्याची घोषणा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती़ परंतु घोषणेचे हे कमळ फुललेच नसल्याचे गुरुवारी रिकाम्या रेल्वे डब्यावरुन दिसले़ ११०० प्रवासी क्षमता असलेल्या या गाडीतून जवळपास ४०० ते ५०० कार्यकर्तेच मुंबईला रवाना झाले़नांदेड जिल्ह्यातून या मेळाव्यासाठी दोन रेल्वे आरक्षित करण्यात आल्या होत्या़ त्यातील एक रेल्वे गुरुवारी सकाळी नांदेड रेल्वेस्थानकावरुन सोडण्यात येणार असून त्यामध्ये हजारो कार्यकर्ते मुंबईला जाणार असल्याची घोषणा भाजपा पदाधिकाºयांनी बुधवारी झालेल्या पत्रपरिषदेत केली होती़ भाजपा महानगर शाखेच्या वतीने एक गाडी आरक्षित करण्यात आली होती़ निशुल्क जाण्याची व्यवस्था केल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येतील असा अंदाज होता़परंतु झाले नेमके उलटेच़ रेल्वेस्टेशनवर सकाळी ११ वाजता शंभरावर कार्यकर्ते होते़ यामध्ये महानगराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्यासह इतर पदाधिकाºयांचा समावेश होता़ साडे बारा वाजेच्या सुमारास आरक्षित केलेली गाडी फलाट क्रमांक १ वर येणार असल्याची घोषणा करण्यात आली़ त्याचबरोबर ही गाडी फक्त महानगरातील कार्यकर्त्यांसाठी असून त्यामध्ये ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी बसू नये असेही स्पष्ट करण्यात आले़ बॅच नसलेल्या कार्यकर्त्यांना गाडीत प्रवेश देणार नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले़ त्यानंतर आलेल्या १८ डब्यांच्या या विशेष गाडीतील बहुतांश डबे रिकामेच होते़ डब्यातील कार्यकर्तेही एैसपैस बसले होते़ थोड्याच वेळात गाडी मुंबईकडे रवाना झाली़ परंतु या सर्व प्रकारात पदाधिकाºयांच्या घोषणा रेल्वे इंजिनच्या धुराप्रमाणे हवेतच गेल्या़महामेळाव्यासाठी जाणाºया रेल्वेतील बहुतांश डबे रिकामे असल्याबाबत भाजपाचे महानगराध्यक्ष डॉ़संतुक हंबर्डे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांचा फोन आऊट आॅफ रेंज होता़ त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही़ तर जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांचा भ्रमणध्वनीही बंदच होता़
नांदेडमध्ये आरक्षित रेल्वेचे डबे रिकामेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 12:34 AM
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथे ६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यासाठी नांदेड जिल्ह्यातून १४ हजार कार्यकर्ते जाणार असल्याची घोषणा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती़ परंतु घोषणेचे हे कमळ फुललेच नसल्याचे गुरुवारी रिकाम्या रेल्वे डब्यावरुन दिसले़ ११०० प्रवासी क्षमता असलेल्या या गाडीतून जवळपास ४०० ते ५०० कार्यकर्तेच मुंबईला रवाना झाले़
ठळक मुद्देभाजपचा महामेळावा : क्षमता ११०० प्रवाशांची कार्यकर्ते मात्र जेमतेमच