लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सामाजिक न्यायभवन इमारतीतील जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांच्या कार्यालयात येवून गोंधळ घालत त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली़ या घटनेच्या विरोधात गगराणी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन करीत निषेध नोंदविला़सामाजिक न्यायभवन इमारतीमध्ये जिल्हा जात पडताळणी समितीचे कार्यालय आहे़ सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अप्पर जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष राम गगराणी हे कार्यालयात सुनावणी घेत होते़ त्याचवेळी त्या ठिकाणी भारिप बहुजन महासंघाचे काकासाहेब डावले हे जबरदस्तीने घुसले़ यावेळी डावले यांनी गगराणी व इतर कर्मचाºयांना शिवीगाळ करीत खुर्च्याची मोडतोड केली़ टेबलवरील कागदपत्रेही फेकली़ त्याचबरोबर गगराणी यांच्यावर हात उगारला़ यावेळी इतर कर्मचाºयांनी मधस्थी करीत डावले यांची समजूत घालत त्यांना बाहेर काढले़ या प्रकरणात अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे़ दरम्यान, घटनेच्या निषेधार्थ कार्यालयातील कर्मचाºयांनी मंगळवारी कामबंद आंदोलन केले़ तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली़बंदोबस्ताची मागणीजिल्हा जात पडताळणी समिती ही अर्धन्यायिकचा दर्जा असलेली समिती आहे़ त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरुपी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी समाज कल्याण कर्मचारी संघटना गट क च्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे केली़ एखाद्या प्रकरणात योग्य पुरावे नसल्यास समितीमार्फत सदर प्रकरणात दक्षता पथक तयार करण्यात येवून सुनावणी ठेवण्यात येते़ या इमारतीत विविध सहा महामंडळे आहेत़ त्यामुळे या ठिकाणी नेहमी वर्दळ असते़ त्यामुळे या ठिकाणी कायमचा पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे़
नांदेडमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी अध्यक्षांना धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:38 AM