लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : भारतीय सैन्यासाठी फे्रंच कंपनीकडून घेण्यात येणाऱ्या राफेल विमानाच्या खरेदीत मोदी सरकारने ४१ हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याच्या प्रकरणात काँग्रेसचे देशभरात आंदोलन सुरु आहे़ त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी नांदेडात मोर्चा काढण्यात आला होता़ या मोर्चाला जिल्हाभरातून हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते़ शहरातील सर्वच रस्ते कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते़ या मोर्चाने शहर दणाणून गेले होते़मोर्चासाठी आयटीआय चौकातील महात्मा फुले पुतळ्याजवळ शामियाना उभारण्यात आला होता़ त्यात नांदेडात सकाळी जोरदार पाऊस सुरु झाला होता़ परंतु या पावसाचा कार्यकर्त्यांच्या गर्दीवर कोणताही परिणाम झाला नाही़ सकाळपासूनच जिल्हाभरातून काँग्रेस कार्यकर्ते वाहनांनी शहरात दाखल होत होते़ कार्यकर्त्यांची ही वाहने पार्क करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती़ सकाळी ११ वाजेपर्यंत आयटीआय चौक गर्दीने फुलून गेला होता़ त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत होती़ त्यामुळे पोलिसांनी ऐनवेळी या मार्गावरील वाहतूक वळविली़मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस पक्षाचे राज्याचे सहप्रभारी आ. संपतकुमार, आशिष दुआ, पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे, माजी पालकमंत्री आ.डी.पी.सावंत, काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, आ. वसंतराव चव्हाण, लियाकतअली अन्सारी यांनी केले. यावेळी आ़संपतकुमार, आशिष दुआ यांनी मोदी सरकारच्या उद्योगपतीधार्जिण्या धोरणावर सडकून टीका केली़ ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ असे म्हणणारे मोदी उद्योगपतींसाठी मात्र पायघड्या घालत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला़त्याचबरोबर माजी पालकमंत्री डी़पी़सावंत, आ़अमरनाथ राजूरकर यांनी देशातील जनतेला सध्या सर्वात बुरे दिन असल्याचा उल्लेख करीत महागाईने सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाल्याचे नमूद केले़दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरुवात झाली होती़ यावेळी मोर्चाचे एक टोक आयटीआय चौक तर दुसरे टोक वजिराबाद चौकात होते़ शिवाजीनगर, कलामंदिर, वजिराबाद चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळामार्गे हा मोर्चा दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला़ दोन वाहनांवर राफेल विमानांची प्रतिकृतीही लावण्यात आली होती़ मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर करण्यात आली़ मोर्चात माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माधवराव पाटील जवळगावकर, रोहिदास चव्हाण, रावसाहेब अंतापूरकर, प्रदेश सरचिटणीस बी. आर. कदम, जि.प.अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, महापौर शीला भवरे, उपमहापौर विनय गिरडे पाटील, सभापती शमीम अब्दुल्ला, विरेंद्रसिंघ गाडीवाले, माधवराव मिसाळे, शीला निखाते, संगीता तुप्पेकर, अल्का शहाणे, माजी महापौर अब्दुल सत्तार, बलवंतसिंघ गाडीवाले, विजय येवनकर, सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, उपाध्यक्ष श्याम दरक, दिलीप पा.बेटमोगरेकर, बापूराव गजभारे, प्रवक्ते संतोष पांडागळे, मुन्तजिब, मसूदखान, डॉ. श्याम पाटील तेलंग, व्यंकट मुदीराज, शेषराव चव्हाण, नरेंद्र चव्हाण, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंडेकर, शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, अतुल वाघ, बालाजी सूर्यवंशी, अदित्य देवडे, मंगला निमकर, जिल्हा सरचिटणीस अनिल पाटील बाभळीकर, मंगला धुळेकर, अनिता हिंगोले, मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाध्यक्षा कविताताई कळसकर, नगरसेविका संगीता डक, जयश्री पावडे, शुभलक्ष्मी सूर्यवंशी, शिल्पा नरवाडे आदींचा सहभाग होता़युवक काँग्रेसच्या वतीने दुचाकी रॅलीमोर्चापूर्वी युवक काँग्रेसच्या वतीने शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली होती़ या रॅलीत हजारो युवकांनी सहभाग घेतला होता़ हातात राफेल घोटाळ्याचे पोस्टर घेवून हे तरुण मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते़ त्यामुळे परिसर दणाणून गेला होता़राफेल विमानाच्या प्रतिकृतीने वेधले लक्षमाजी पालकमंत्री आ़डी़पी़सावंत, आ़अमरनाथ राजूरकर यांनी मोर्चाचे यशस्वी नेतृत्व केले़ मोर्चाची गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरु होती़ मोर्चात राफेल विमानांची प्रतिकृती वाहनांवर ठेवण्यात आली होती़ ही प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती़ त्याचबरोबर प्रत्येक गावनिहाय आलेले कार्यकर्ते आपआपल्या बँड पथकासह या मोर्चात सहभागी झाले होते़ बँडच्या तालावर हातात काँग्रेसचे ध्वज घेतलेले कार्यकर्ते सकाळपासून जथ्या-जथ्यांनी मोर्चात सहभागी होत होते़
काँग्रेसच्या विराट मोर्चाने नांदेड दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:33 AM
मंगळवारी नांदेडात मोर्चा काढण्यात आला होता़ या मोर्चाला जिल्हाभरातून हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते़ शहरातील सर्वच रस्ते कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते़ या मोर्चाने शहर दणाणून गेले होते़
ठळक मुद्देराफेल विमान खरेदी घोटाळा : मोर्चात जिल्हाभरातून हजारो कार्यकर्ते सहभागी