लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : उर्दू संवर्धन आणि उर्दू भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आठ कोटी निधीतून उभारलेल्या अन् उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या उर्दू घरला लागलेली आग यामागे घातपात असल्याचा आरोप करीत, याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी विविध संघटनांनी केली़ याबाबत त्यांनी बुधवारी जिल्हाधिका-यांची भेट घेतली़राज्य शासनाच्या निधीतून राज्यात सर्वप्रथम नांदेडात उर्दू संवर्धन व उर्दू भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी उर्दू घर स्थापन करण्यात आले़ यामध्ये मनपाचाही काही वाटा होता़ जवळपास आठ कोटींचा निधी खर्च करुन अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे उर्दू घर उभारण्यात आले़ परंतु राजकीय स्वार्थापोटी गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचे उद्घाटन रखडले आहे़ त्यामुळे रिकामे असलेले उर्दू घर मद्यपी आणि जुगा-यांचा अड्डा बनले़ त्यात उर्दू घराच्या निवास व इतर सोयीसुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे़ याबाबत एक-एक गुपिते बाहेर येत असताना हा भ्रष्टाचार लपविण्यासाठी उर्दू घरला आग लावली आहे़ त्यामुळे या जाळपोळ प्रकरणाची जिल्हाधिकाºयांनी विशेष समितीकडून चौकशी करावी़ त्याचबरोबर उर्दू घराच्या झालेल्या नुकसानीची दुरुस्ती करुन एक महिन्याच्या आत उर्दू घरच्या लोकार्पणाचा सोहळा घ्यावा, अशी मागणी विविध संघटनांनी बुधवारी जिल्हाधिका-यांकडे केली़ यावेळी अनिकेत कुलकर्णी, फारुक अहमद, अल्ताफ हुसेन, सिकंदर मौलाना, डॉ़मुजाहेद खान, डॉ़एम़एग़फार, मोहम्मद शोएब, अ़समद खान, आबेद अली, एजाज अहेमद शेख, मोहम्मद अझरोद्दीन, अॅड़शेख बिलाल, मोहम्मद कासीम , मोईन कुरेशी, मेराज अन्सारी, अल्ताफ सानी, गौस इनामदार, शेख रऊफ, मो़जुबेर, हैदर अली उपस्थित होते़
नांदेडातील उर्दू घर दुर्घटनेमागे घातपात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:28 AM
उर्दू संवर्धन आणि उर्दू भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आठ कोटी निधीतून उभारलेल्या अन् उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या उर्दू घरला लागलेली आग यामागे घातपात असल्याचा आरोप करीत, याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी विविध संघटनांनी केली़ याबाबत त्यांनी बुधवारी जिल्हाधिका-यांची भेट घेतली़
ठळक मुद्देभ्रष्टाचार लपविण्यासाठी केले कृत्य