नांदेड : महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीच्या विशेष सभेस महिना उलटल्यानंतरही सर्वसाधारण सभा न झाल्याने नवनियुक्त सदस्यांची उत्सुकता अधिकच ताणली जात आहे़ त्यातच आता किनवट नगरपालिका निवडणुका आणि नागपूरमध्ये होणाºया हिवाळी अधिवेशनावर काँग्रेसचा मोर्चा पार पाडल्यानंतरच महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़महापालिका निवडणुकीचा निकाल १२ आॅक्टोबर रोजी लागल्यानंतर महापौर, उपमहापौर निवडीची विशेष सभा १ नोव्हेंबर रोजी झाली होती़ या सभेला उपस्थित राहिलेल्या नगरसेवकांना आता सभागृहातील कामकाजाची उत्सुकता लागली आहे़ त्यात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सर्वसाधारण सभा होणार असे सांगितले जात होते़ नोव्हेंबर संपल्यानंतर ११ किंवा १२ डिसेंबरची तारीख सर्वसाधारण सभेसाठी देण्यात येत होती़ त्यामुळे ११ किंवा १२ रोजी तरी सभा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती़ मात्र नागपूर येथे होणाºया हिवाळी अधिवेशनावर कॉग्रेसचा मोर्चा काढला जाणार आहे़ नांदेडहून या मोर्चाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे़ त्यात किनवट नगरपालिकेची निवडणूकही १३ डिसेंबर रोजी होत आहे़ त्यामुळे या निवडणुकीसाठीही काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी कुमक किनवटमध्ये ठाण मांडून आहे़या पार्श्वभूमीवर नांदेड महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा पुढेच ढकलल्या जात आहे़ परिणामी पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांची उत्सुकता आणखीच ताणली जात आहे़दुसरीकडे प्रशासनाकडून अनेक प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत़ त्यात संपूर्ण शहराला वेठीस धरणाºया कचºयाच्या निविदा प्रक्रियेला मान्यता देण्याचा ठराव अग्रक्रमावर आहे़मार्च २०१६ पासून शहरात खाजगी कंत्राटदाराने कचरा उचलण्याचे काम सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात कचºयाच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे़ अजूनही ती समस्या कायम असल्याने प्रशासनाने कचरा उचलण्यासाठी मागविलेल्या निविदा प्रक्रियेत मुंबईच्या कंत्राटदाराची सर्वात कमी दराची निविदा प्रशासनाकडून मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवली जाणार आहे़त्याचवेळी दुसºया टप्प्यातील दलित वस्ती निधीतील कामांचे प्रस्तावही प्रशासनाकडून अंतिम करण्यात आले आहेत़ जवळपास १४ कोटी रुपयांच्या निधीचे प्रस्ताव आहेत़शहरातील अत्यावश्यक कामाचे प्रस्तावच दलित वस्ती निधीतून ठेवले जाणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केली आहे़ पावसाळ्याच्या काळात ज्या- ज्या भागात पुराच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता, त्या भागातील कामे प्राधान्यक्रमाने समाविष्ट केल्याचे ते म्हणाले़मनपा स्थायी समितीवर वर्णीसाठी लॉबिंगमहापालिकेच्या आर्थिक निर्णयात महत्त्वाची भूमिका असलेल्या स्थायी समितीवर वर्णी लागावी यासाठी नगरसेवकांकडून या ना त्या माध्यमातून लॉबिंग केली जात आहे. स्थायी समिती सदस्यांची निवडही महापालिकेच्या पहिल्याच सभेत अपेक्षित आहे. काँग्रेसचे १५ तर भाजपाचा एक सदस्य स्थायी समितीत जाणार आहे. त्याचवेळी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिका प्रशासनास निवडणूक निकालानंतर कोणकोणत्या समित्यांची स्थापना झाली याबाबत विचारणा केली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पहिलीच सभा घेण्याबाबत आग्रह केला जात आहे.
किनवट निवडणुकीमुळे नांदेड -वाघाळा मनपाची सभा लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 12:50 AM
नांदेड : महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीच्या विशेष सभेस महिना उलटल्यानंतरही सर्वसाधारण सभा न झाल्याने नवनियुक्त सदस्यांची उत्सुकता अधिकच ताणली जात आहे़ त्यातच आता किनवट नगरपालिका निवडणुका आणि नागपूरमध्ये होणाºया हिवाळी अधिवेशनावर काँग्रेसचा मोर्चा पार पाडल्यानंतरच महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़
ठळक मुद्देनव्या सदस्यांना उत्सुकता : प्रशासनाचेही महत्त्वपूर्ण प्रस्ताव तयार