शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

नांदेडमध्ये सेनेच्या मतदारसंघातील कामे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:55 AM

दलितवस्ती निधी योजनेअंतर्गत सिडको भागातील जवळपास पावणेतीन कोटी रुपयांच्या कामांना पालकमंत्री रामदास कदम यांनी स्थगिती दिली. त्यात सिडकोतील मुख्य रस्त्याचा समावेश आहे. पालकमंत्र्यांच्या या निर्णयामुळे संतप्त भावना उमटत असून या भागाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे आ. हेमंत पाटील करीत असतानाही हा निर्णय सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांविरोधात नाराजी : सिडकोवासियांच्या संतप्त भावना; मुख्य रस्त्याची दुर्दशा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : दलितवस्ती निधी योजनेअंतर्गत सिडको भागातील जवळपास पावणेतीन कोटी रुपयांच्या कामांना पालकमंत्री रामदास कदम यांनी स्थगिती दिली. त्यात सिडकोतील मुख्य रस्त्याचा समावेश आहे. पालकमंत्र्यांच्या या निर्णयामुळे संतप्त भावना उमटत असून या भागाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे आ. हेमंत पाटील करीत असतानाही हा निर्णय सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला आहे.दलितवस्ती निधीअंतर्गत २०१७-१८ साठी १५ कोटी ६६ लाख ५४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महापालिकेने सर्वसाधारण ठराव करत कामांची निवड केली. जवळपास ६५ कामे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आली होती. महापालिकेने प्रस्तावित केलेल्या १५ कोटी ८३ लाख ५२ हजार रुपयांच्या ६४ कामांना मंजुरी देण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव पाठविले होते.यापैकी पालकमंत्र्यांनी १५ कोटी ८३ लाख ५२ हजार रुपयांच्या ७० विकासकामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. पालकमंत्र्यांनी मंजूर केलेली ४९ कामे ही महापालिकेने प्रस्तावित केलेली आहेत. पालकमंत्र्यांनी महापालिकेने पाठविलेली १७ कामे रद्द करताना नवीन २१ कामे सुचविली आहेत. या कामाचे कोणतेही प्रस्ताव महापालिकेने पाठविले नव्हते. परिणामी पालकमंत्र्यांनी स्वतंत्रपणे ही कामे सुचविली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत महापालिकेला कळविताना पालकमंत्र्यांनी सुचविलेल्या कामांचे प्रस्ताव नव्याने पाठविण्याची सूचना केली आहे.पालकमंत्र्यांच्या निर्णयास महापालिका पदाधिकाºयांनी विरोध केला आहे. पालकमंत्र्यांनी रद्द केलेल्या कामामध्ये सिडकोतील मुख्य रस्त्याचाही समावेश होता. जवळपास २ कोटी रुपये खर्चून दलितवस्ती निधीतून हा रस्ता केला जाणार होता. त्याचवेळी प्रभाग २० मध्ये ३६ लाखांची कामे सुचविली होती. प्रभाग १९ मध्येही ३८ लाख ७८ हजारांची कामे सुचविली होती. ही कामे रद्द केली आहेत. पालकमंत्र्यांनी स्वत: सुचविलेल्या कामामध्ये बहुतांश कामे ही उत्तर नांदेडातील आहेत.दक्षिण नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे आ. हेमंत पाटील हे करतात. त्यांच्या मतदारसंघातील कामे रद्द करुन उत्तर नांदेडात कामे सुचविणे ही बाब अनेकांना खटकणारी ठरली आहे. त्याचवेळी शिवसेनेत सर्वकाही अलबेल आहे, ही बाबही चुकीचीच ठरली आहे.सिडकोत मुख्य रस्त्याची गरज होती. या भागातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्याकडे दुर्लक्षच झाले आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा सर्वस्तरातून निषेध केला जात आहे.महापालिका पदाधिकाºयांनीही पालकमंत्र्यांचा हा निर्णय शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ फासणारा असल्याची टीका केली आहे. या विरोधात वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेण्याचाही इशारा दिला आहे. सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, भाजपाच्या नगरसेविका बेबीताई गुपिले यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे.महापालिका फेरठराव घेणार का ?महापालिकेने पाठविलेले १७ ठराव रद्द करुन पालकमंत्री कदम यांनी २१ नवी कामे सुचविली आहेत. जिल्हाधिकाºयांनी याबाबत महापालिकेला कळविताना २१ कामे ही महापालिकेच्या प्रस्तावात नमूद नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच २१ कामांसाठी समाजकल्याण अधिकाºयांचा स्थळ पाहणी अहवालही नसल्याचे सांगितले आहे.त्यामुळे पालकमंत्र्यांनी सादर केलेल्या नव्या २१ कामांचे फेरप्रस्ताव पाठवावेत, अशी सूचना महापालिका आयुक्तांना जिल्हाधिकाºयांनी केली आहे. विशेष म्हणजे, तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांच्या बदलीनंतर नांदेड महापालिकेचा पदभार हा जिल्हाधिकाºयांकडे तात्पुरत्या स्वरुपात सोपविण्यात आला आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी आणि आयुक्त हे भार सांभाळणारे अरुण डोंगरे या प्रकरणात कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे. त्याचवेळी महापालिका सभागृह फेरप्रस्ताव सादर करेल का हेही लवकरच कळणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्तRamdas Kadamरामदास कदम