नांदेड जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता; अध्यक्षपदी अंबुलगेकर तर उपादध्यक्षपदी नरसारेड्डी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 04:33 PM2020-01-21T16:33:32+5:302020-01-21T16:36:06+5:30

६२ सदस्यीय नांदेड जिल्हा परिषदेत काँग्रेसकडे सर्वाधिक २८ सदस्य आहेत.

Nanded Zilla Parishad has the power to Mahavikas Aaghadi; elected Ambulagekar as the president and Narsareddy as the vice president | नांदेड जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता; अध्यक्षपदी अंबुलगेकर तर उपादध्यक्षपदी नरसारेड्डी

नांदेड जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता; अध्यक्षपदी अंबुलगेकर तर उपादध्यक्षपदी नरसारेड्डी

googlenewsNext
ठळक मुद्देउपाध्यक्षपदावर मतैक्य घडविण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा निर्णय उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनाही आग्रही होती.

नांदेड : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अखेर काँग्रेसच्या मंगाराणी अंबुलगेकर तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मा नरसारेड्डी सतपलवार यांची बिनविरोध निवड झाली. यांनी निवडीच्या माध्यमातून नांदेड जिल्हापरिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. 

६२ सदस्यीय नांदेड जिल्हा परिषदेत काँग्रेसकडे सर्वाधिक २८ सदस्य आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येक ६ सदस्य असून रासपाच्या एका सदस्यासह एका अपक्ष सदस्यांनी महाविकास आघाडीला पाठींबा दिल्याने आघाडीचे संख्याबळ ४३ एवढे झाले होते. अध्यक्षपद काँग्रेसकडे जाणार हे स्पष्ट होते. या पदासाठी मंगाराणी अंबुलगेकर (बाºहाळी गट), विजयश्री कमठेवाड (बरबडा गट), शकुंतला कोमलवाड (यवती गट) आणि सविता वारकड (बारड गट) या चौघी दावेदार होत्या. अखेर पक्ष श्रेष्ठींनी अंबुलगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनाही आग्रही होती.

उपाध्यक्षपदावर मतैक्य घडविण्यासाठी सोमवारी रात्री उशीरा पर्यंत तीन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकावर बैठका झाल्या. मात्र रात्री उशिरा पर्यंत एकमत न झाल्याने मंगळवारी सकाळी काँग्रेसकडून संजय बेळगे, शिवसेनेकडून बबन बारसे आणि पद्मा नरसारेड्डी सतपलवार तर राष्ट्रवादीकडून संगीता मॅकलवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ होती. या वेळेत महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची काँग्रेस नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्याचे निश्चित करित या पदाकरिता पद्मा नरसारेड्डी सतपलवार यांची निवड झाली. त्यानूसार उपाध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या इतरांनी आपले अर्ज मागे घेतल्याने सतपलवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले. निवडीनंतर काँग्रेससह शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांचे आतीषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.

Web Title: Nanded Zilla Parishad has the power to Mahavikas Aaghadi; elected Ambulagekar as the president and Narsareddy as the vice president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.