लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : दरवर्षीप्रमाणे यंदाही पौष आमावस्यानिमित्त गोदावरी महामहोत्सव समितीच्या वतीने १६ ते १८ जानेवारी या कालावधीत गोदावरी महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे़ या महोत्सवासाठी हजारो भाविक गोदावरीच्या विविध घाट, मठ, मंदिर, दर्गाह परिसरात उपस्थित राहणार असल्याचे समितीने कळविले आहे़नांदेड जिल्ह्यातील हा पारंपरिक गोदावरी महामहोत्सव १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे़ पहाटेपासून शहराच्या विविध भागातून मानकरी दिंड्याचे आगमन होईल़ मानकरी दिंड्यासह जथ्थे, मानकरी सुकळीकर, येळेगावकर, नंदिमहाराज, वारकवाडी, नामदेव महाराज यांच्या दिंड्याचे विविध ठिकाणी स्वागत होते़ सदर दिंड्या १७ जानेवारी रोजी सकाळी रामघाट येथून निघून किल्ला गोदावरी मंदिर-कल्याणराव समाधी नावघाट पूजा आटोपून दर्गा सराय संत दासगणू घाट येथे गळाभेट कार्यक्रम होईल़ या एकात्मता कार्यक्रमानंतर मौलाली दर्गाह करबला येथील सत्कार घेवून गौतमेश्वर तारातीर्थ मंदिर धनेगाव येथील संत समागम यात्रेत सहभागी होतील़ महोत्सवादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विकासविषयक चर्चा, नांदेड अपीरल क्लस्टर-तयार कपडे होजीअरी प्रोजेक्ट चर्चा-युनिट नोंदणी कार्यक्रम होणार आहेत़ १८ जानेवारी रोजी काला कार्यक्रमानंतर महोत्सवाची समाप्ती होईल, अशी माहिती महामहोत्सव समितीचे प्रा़डॉ़एऩई़ अंभोरे, रावसाहेब महाराज, ग्रिष्मसिंह देशमुख, प्रा़डॉ़ पुष्पा कोकीळ, प्रा़डॉ़जयश्री देशमुख, अॅड़सावित्री जोशी आदींनी कळविली आहे़जिल्हा प्रशासनास समितीचे निवेदनगोदावरी महामहोत्सवानिमित्त येणाºया दिंंड्या आणि भाविकांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना व सुविधा पुरविण्यासंदर्भात समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे़ यामध्ये स्नानासाठी गोदावरीच्या दोन्ही काठावरील काळेश्वर विष्णूपुरी, कोटतीर्थ, असर्जन, उर्वसीडंकीन, भीमघाट, गोवर्धनघाट, रामघाट, बाळगीर महाराजघाट, साईमंदिर, सेना न्हावी मंदिर, कौठा, नगीनाघाट, श्रीचंद्रघाट, नामदेवघाट, कल्याणराव समाधीस्थळ आदी ठिकाणी कुंड तयार करून ते पाण्याने भरून घेणे, रस्त्याची सुविधा, खड्डे बुजविणे, पथदिवे लावणे, आरोग्य सुविधा, जीवरक्षक तैनात करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़निवेदनावर संयोजक प्रा़ डॉ़ एऩ ई़ अंभोरे, हरेशभाई ठक्कर, रावसाहेब ऊर्फ बाळगीर महाराज, गिष्मसिंह देशमुख, देवराव काळे, प्रा़डॉ़पुष्पाताई कोकीळ, अॅड़सावित्री जोशी, एऩ के़ क्षीरसागर, प्रा़ डॉ़ मेहमुदा बेगम, अशोकराव पवळे, प्रा़ डॉ़ जयश्री देशमुख, नामदेराव कदम, आनंद वाघमारे, बी़ आऱ माने, मुतवली अंगारे शाह, पी़ डी़ भोसले, सुचिता उखळकर, लक्ष्मीकांत माळवतकर, केशव मालेवार, सतू महाराज आदींच्या स्वाक्षºया आहेत़१६ ते १८ जानेवारीदरम्यान गोदावरी महामहोत्सव४हिंदू-मुस्लिम एकात्मतेची महोत्सवाला परंपरा४प्रशासनाकडून तयारी सुरु
नांदेडात गोदावरी महामहोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 12:09 AM