शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नांदेडात शिवरायांचा जयघोष ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:53 AM

नांदेड : ढोल-ताशांचा गजर आणि डफावर थाप देत शिवजन्मोत्सवानिमित्त नांदेडात शिवगर्जना दुमदुमली़ रयतेच्या राजाचा जयघोष करीत दुपारपासून सुरु झालेल्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरु होत्या़ जिकडे-तिकडे खांद्यावर भगवा ध्वज घेवून सळसळत्या रक्ताची तरुणाई शिवरायांच्या नावाचा जयघोष करीत होती़ त्यामुळे अवघे वातावरण शिवमय झाले होते़ स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, छत्रपती संभाजीराजे मित्रमंडळ, मावळा ग्रूप, स्वराज्य मित्रमंडळ, लेबर कॉलनी छावा संघटना, कुणबी मराठा महासंघ आदींनी स्वतंत्रपणे मिरवणुका काढल्या.

नांदेड : ढोल-ताशांचा गजर आणि डफावर थाप देत शिवजन्मोत्सवानिमित्त नांदेडात शिवगर्जना दुमदुमली़ रयतेच्या राजाचा जयघोष करीत दुपारपासून सुरु झालेल्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरु होत्या़ जिकडे-तिकडे खांद्यावर भगवा ध्वज घेवून सळसळत्या रक्ताची तरुणाई शिवरायांच्या नावाचा जयघोष करीत होती़ त्यामुळे अवघे वातावरण शिवमय झाले होते़ स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, छत्रपती संभाजीराजे मित्रमंडळ, मावळा ग्रूप, स्वराज्य मित्रमंडळ, लेबर कॉलनी छावा संघटना, कुणबी मराठा महासंघ आदींनी स्वतंत्रपणे मिरवणुका काढल्या.‘मानिनी’ चा पुढाकार : ४५० जणांचा नेत्रदानाचा संकल्पमानिनी मराठा महिला मंडळाच्या वतीने आयोजित नेत्रदान शिवसंकल्प शिबिरात जवळपास साडेचारशे जणांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला आहे़ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आयोजित शिबिरात सर्वांनी नोंदणी करून नेत्रदानाचे फॉर्म भरून दिले़उद्घाटन डॉ़तेजस्विनी वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी डॉ़शीला कदम, डॉग़ायत्री वाडेकर, डॉ़ज्योती देशमुख, अरूंधती पुरंदरे यांची प्रमुख उपस्थिती होती़ सदर उपक्रम नेत्ररोग तज्ज्ञ डॉ़सारिका मोरे, डॉ़ अंजली आगळे, डॉ़स्मिता टेंगसे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला़ यावेळी डॉ़नम्रता तरोडेकर, डॉ़विद्या पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़डॉ़अंजली वागळे यांनी नेत्रदानाचे महत्त्व विशद केले़यशस्वीतेसाठी डॉ़स्मिता कदम, डॉ़स्मिता गायकवाड, डॉ़सुनीता कदम, डॉ़वर्षा देशमुख, सुजाता बारडकर, प्रणिता वाघमारे, साधना तरोडेकर, डॉक़ल्पना देशमुख आदींनी सहकार्य केले़ शिबिरात ११ वर्षांचा मुलगा सौरभ देशमुखपासून ८० वर्षे वय असणाºया वृद्धांनीही नेत्रदान करण्याचा संकल्प केला़प्रवीण साले मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रण फॉर छत्रपती ड्रिम मॅरेथॉन स्पर्धेत युवक-युवतींनी सहभाग नोंदविला़ उद्घाटन भाजप महानगराध्यक्ष डॉ़संतुक हंबर्डे यांनी केले़ यावेळी शंतनु डोईफोडे, चैैतन्यबापू देशमुख, अरूंधती पुरंदरे, शीतल खांडिल, दीपकसिंह ठाकूर, डॉ़बालाजी गिरगावकर, कुणाल गजभारे, सुरेश जोंधळे, हास्सेवाड, राष्ट्रपाल पांडागळे आदी उपस्थित होते़ स्पर्धेत मुलींमधून प्रथम भारती दुधे, द्वितीय आरती दुधे, तृतीय कीर्ती, मुलांमधून प्रथम संजय झाकणे, द्वितीय किरण मात्रे, तृतीय क्रमांक विनोद हेगडे यांनी पटकावला़देखाव्यातून शेतक-यांचे प्रश्न आणले ऐरणीवरमिरवणुकांमध्ये सामाजिक संदेश देणारे देखावे लक्ष वेधून घेत होते़ महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा संघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीष जाधव यांच्या वतीने चित्ररथ काढण्यात आला़ यामध्ये शिवकाळातील बळीराजा आणि सद्य:स्थितीतील शेतकºयांची अवस्था दाखविण्याचा प्रयत्न केला़ या रॅलीत जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, संजय कदम, देवीदास गायकवाड, गजानन कहाळेकर, डॉ़ भोसले, उत्तम क्षीरसागर, राजश्री मुळे, विजया लुंगारे, अंजना जाधव तर छावाने काढलेल्या मिरवणुकीत स्वराज्य ढोल पथकाच्या तालावर अनेकांनी ठेका धरला होता़ यावेळी तानाजी पाटील, जिल्हाध्यक्ष पंजाबराव काळे, दशरथ कपाटे, पंकज उबाळे, स्वप्निल पाटील रातोळीकर, नितीन गिरडे, दीपक तुडमे, प्रताप कदम, शंकर जाधव,अंगद पाटील आदींचा सहभाग होता़ढोल-ताशामिरवणुकांमध्ये ढोल-ताशांचे आकर्षण पहायला मिळाले़ मिरवणुकांमध्ये एकही डीजे नव्हता, हे विशेष! कोल्हापूर, पुण्यातील ढोलपथकांना फिके पाडेल अशा प्रकारचा ढोल-ताशांचा गजर नांदेडकरांना अनुभवायला मिळाला़ एका पायावर उडी मारत ढोल वाजवून, भगवा ध्वज उंचावत जयजयकार केला़लेझीम पथकमुख्य मिरवणुकीत महात्मा फुले शाळेतील मुलींच्या लेझीम पथकाच्या सादरीकरणाने सर्वांची वाहवा मिळविली़ यामध्ये सहभागी मुलींकडून लेझीमचे कौतुकास्पद सादरीकरण झाले़ शेतकरी गीतांचा निनाद लेझीम पथकाने आपल्या कलेतून उपस्थितांसमोर मांडला़ आयटीआय चौक येथील सादरीकरणास उपस्थितांनी टाळ्यांची साथ दिली़