शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

नांदेडात सुरक्षा उपाययोजनेत स्कूल बसेस नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 8:31 PM

: जिल्ह्यात आजघडीला दोन हजारांवर स्कूल बसेस धावत आहेत़ दरवर्षी प्रादेशिक परिवहन विभागाकडून शाळा सुरु झाल्यानंतर या बसेसची तपासणी करण्यात येते़ रविवारी चैतन्यनगर भागात अनेक स्कूल बसची तपासणी करण्यात आली़

ठळक मुद्दे ९० टक्के स्कूल बसमध्ये ना अग्निशमनची यंत्रणा होती ना प्रथमोपचार पेटी़ अनेक वाहनांचे दरवाजे आणि खिडक्यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले़

नांदेड : जिल्ह्यात आजघडीला दोन हजारांवर स्कूल बसेस धावत आहेत़ दरवर्षी प्रादेशिक परिवहन विभागाकडून शाळा सुरु झाल्यानंतर या बसेसची तपासणी करण्यात येते़ रविवारी चैतन्यनगर भागात अनेक स्कूल बसची तपासणी करण्यात आली़ यातील ९० टक्के स्कूल बसमध्ये ना अग्निशमनची यंत्रणा होती ना प्रथमोपचार पेटी़ अनेक वाहनांचे दरवाजे आणि खिडक्यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले़ विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी अधिकाऱ्यांनी यावेळी चालकांना चांगलेच धारेवर धरले़ 

नांदेड शहरात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेसची संख्या ४०० आहे़ तर अनधिकृतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे रिक्षा व इतर छोट्या वाहनांची संख्या त्यापेक्षा अधिक आहे़ अनेकवेळा या बसेसचे चालक प्रशिक्षित नसतात़ बसची नियमित तपासणी न झाल्यामुळे मध्येच त्या बंद पडणे, किरकोळ अपघाताच्या घटनाही घडतात़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतात़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते़ त्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने रविवार व सुटीच्या दिवशी स्कूल बसची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे़ 

दर रविवारी किंवा सुटीच्या दिवशी किमान १५० स्कूल बसची तपासणी करण्यात येणार आहे़ आज चैतन्यनगर परिसरात अनेक स्कूल बसची तपासणी करण्यात आली़ त्यात वाहनाचा चेसिस क्रमांक, परवाना, कागदपत्रे, वाहनात सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना, चालकाचे वर्तन आदींची तपासणी करण्यात आली़ त्यात अनेक वाहनांमध्ये अग्निशमनची कुठलीच यंत्रणा आढळली नाही़ त्याचबरोबर प्रथमोपचार पेटीही ठेवण्यात आली नव्हती़ याबाबत प्रादेशिक परिवहनच्या अधिकाऱ्यांनी स्कूल बसचालकांना सूचना दिल्या़ त्याचबरोबर अचानकपणे स्कूल बसची तपासणी करुन कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे़ दरम्यान, या वाहन तपासणीतून रिक्षातून होणारी विनापरवाना वाहतूक मात्र सुटली आहे़ 

रिक्षांमध्ये विद्यार्थ्यांची ‘फ्रंट सिट’ वाहतूकशहरात विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याचा परवाना नसतानाही अनेक रिक्षांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते़ त्यात विद्यार्थ्यांचे अर्धे शरीर बाहेर व अर्धे आतमध्ये असते़ त्याचबरोबर फ्रंट सिटवर वाहनचालकांच्या दोन्ही बाजूने चिमुकल्या विद्यार्थ्यांना बसविले जाते़ दुसरीकडे ५० आसनक्षमता असलेल्या स्कूल बसमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो़ या बसवरील वाहनचालक हे किती प्रशिक्षित आहेत? हाही संशोधनाचा विषय आहे़ 

पालकांची जबाबदारीही तेवढीच महत्त्वाचीपोलीस, आरटीओ, शाळा व्यवस्थापन याबरोबरच पालकांचीही तेवढीच जबाबदारी आहे़ आपल्या पाल्यांना रिक्षात बसविल्यानंतर तो कितपत सुरक्षित आहे? याकडे सर्रासपणे कानाडोळा करण्यात येतो़ 

टॅग्स :SchoolशाळाRto officeआरटीओ ऑफीसStudentविद्यार्थी