शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

नांदेडात शिवसेनेचा तीन तास रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:58 AM

शहरात मटका, गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे. मुख्य बाजारपेठेतील दुकाने फोडली जात आहेत. पोलिसांचेही भरदिवसा खून होत आहेत. अशा परिस्थितीत गुन्हेगारावर नियंत्रण न ठेवता पोलीस राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करीत आहेत. सेनेच्या जिल्हाप्रमुखांना बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस अधीक्षकांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आ. हेमंत पाटील, आ. सुभाष साबणे आणि आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी बुधवारी केली.

ठळक मुद्देजिल्हाप्रमुखांना मारहाण : पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरात मटका, गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे. मुख्य बाजारपेठेतील दुकाने फोडली जात आहेत. पोलिसांचेही भरदिवसा खून होत आहेत. अशा परिस्थितीत गुन्हेगारावर नियंत्रण न ठेवता पोलीस राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करीत आहेत. सेनेच्या जिल्हाप्रमुखांना बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस अधीक्षकांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आ. हेमंत पाटील, आ. सुभाष साबणे आणि आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी बुधवारी केली.मंगळवारी पुकारलेल्या बंद दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांना पोलिसांनी मारहाण केली होती. या घटनेच्या निषेधार्थ आमदारांसह शेकडो शिवसैनिकांनी शिवाजीनगर दादºयावर तीन तास रास्ता रोको केला़ या प्रकरणातील पोलीस कर्मचाºयांसह पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी आहे़ आंदोलनामुळे वाहतूकव्यवस्था विस्कळीत झाली होती़ यानंतर शिवसेनेच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हाधिकाºयांना पोलीस अधीक्षक यांना निलंबित करण्याच्या मागणीचे निवेदन दिले़यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव कदम, अ‍ॅड. मुक्तेश्वर धोंडगे, धोंडू पाटील, शहरप्रमुख दत्ता कोकाटे, वच्छला पुयड, नागोराव इंगोले, गणेशराव मोरे, निकिता चव्हाण, ज्योतिबा खराटे, बाबाराव शिंदे आदींनीही संतप्त भावना व्यक्त केल्या.आंदोलनात प्रकाश कौडगे, माधव पावडे, युवाप्रमुख माधव पावडे, नारायणराव कदम, साई विभुते, गजानन कदम, डॉ़मनोजराज भंडारी, डॉ़ बी़ डी़ चव्हाण, अशोक उमरेकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा वच्छला पुयड, निकिता चव्हाण, निकिता शहापूरवाड, सरिता बैस, आंनद बोंढारकर, जयवंत कदम, अवतारसिंह पहरेदार, शहरप्रमुख पप्पू जाधव, महेश खेडकर, गणेश मोरे, अशोक मोरे, नेताजी भोसले, उमेश मुंडे, बाळासाहेब देशमुख आदींची उपस्थिती होती़जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी प्रारंभी सकाळी विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीतही पोलीस प्रशासनाविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. भुजंग पाटील यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनी केलेली मारहाण निषेधार्ह असून या घटनेचा निषेध व्यक्त करीत शिवसेनेच्या आमदार, पदाधिकाºयांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामे द्यावेत, समाज सदैव त्यांच्यासोबत राहील, असे मत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले़---स्टंटबाजीसाठी आंदोलन करु नका-हेमंत पाटीलमराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आमचीही भावना आहे. मात्र आंदोलनादरम्यान समाजाच्या आमदारांनाच अश्लील शिवीगाळ करणे ही बाब चुकीची असल्याची प्रतिक्रिया आ. आष्टीकर यांनी दिली. आमदार तसेच लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करुन प्रसिद्धी मिळवायची, आंदोलनादरम्यान स्टंटबाजी करुन लक्ष वेधण्याचे प्रकारही सुरू आहेत. आम्हीही समाजाचे आहोत. आरक्षण मिळावे हीच भावना आहे. त्यामुळे प्रसिद्धी आणि स्टंटबाजीसाठी आंदोलन करु नका, असा सल्ला आ.हेमंत पाटील यांनी दिला. शिवसेना आमदारांची २८ जुलै रोजी मुंबईमध्ये पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाणार आहे, त्या बैठकीत शिवसेनेची भूमिका स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.---पोलिसांमुळेच आंदोलन भडकल्याचा आरोपशिवसेना जिल्हाप्रमुखाला मारहाण यामागे राजकारण असल्याचा आरोपही आ. पाटील यांनी केला. आ. साबणे यांनीही शिवसेना ही मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ असल्याचे स्पष्ट केले. आंदोलना- दरम्यान समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न पोलिसांकडूनच होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शांततेत सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याने कालचे आंदोलन भडकल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणीही आ. साबणे यांनी केली. तर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला मारहाण ही बाब राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी केला.---‘सार्वजनिक हितासाठीच कारवाई’मंगळवारी आंदोलनादरम्यान केलेली कार्यवाही सार्वजनिक हितासाठीच होती़समोर कोण आहे ते न पाहता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिस्थितीनुसार निर्णय घेतल्याचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी सांगितले़

टॅग्स :NandedनांदेडShiv Senaशिवसेनाagitationआंदोलन