शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

दरवाढीची सर्वाधिक झळ नांदेडकरांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 12:41 AM

राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल दरवाढीत नांदेड पहिल्या दोन शहरांमध्ये येते़ नांदेड शहरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्यामुळे नांदेडकर हैराण झाले आहेत़ ४ एप्रिल रोजी नांदेडात पेट्रोल ८३़२१ पैसे तर डिझेल ६९़३७ पैसे प्रतिलिटर होते़ तर ५ एप्रिलसाठी हे दर पेट्रोलसाठी ८३़२४ तर डिझेलसाठी ६९़४० पैसे प्रतिलिटर द्यावे लागणार आहेत़ राज्यात नांदेडला पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या सर्वाधिक झळा बसत असल्याची माहिती मिळाली आहे़ त्यानंतर अकोल्याचा क्रमांक लागतो़

ठळक मुद्देपेट्रोल ८३ तर डिझेल ६९ रुपये लिटर :महत्त्वाच्या शहरांत सर्वाधिक महाग इंधन शहरात

शिवराज बिचेवार।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल दरवाढीत नांदेड पहिल्या दोन शहरांमध्ये येते़ नांदेड शहरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्यामुळे नांदेडकर हैराण झाले आहेत़ ४ एप्रिल रोजी नांदेडात पेट्रोल ८३़२१ पैसे तर डिझेल ६९़३७ पैसे प्रतिलिटर होते़ तर ५ एप्रिलसाठी हे दर पेट्रोलसाठी ८३़२४ तर डिझेलसाठी ६९़४० पैसे प्रतिलिटर द्यावे लागणार आहेत़ राज्यात नांदेडला पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या सर्वाधिक झळा बसत असल्याची माहिती मिळाली आहे़ त्यानंतर अकोल्याचा क्रमांक लागतो़पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरच महागाई अवलंबून आहे़ परंतु, गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे़ मागील वर्षी एप्रिल महिन्यात नांदेडात पेट्रोलचे दर ७४़ ४० पैसे तर डिझेलचा दर ६२़५० पैसे होता़ त्यानंतर वर्षभरात पेट्रोलच्या दरात साधारणत: नऊ रुपये आणि डिझेलच्या दरात सात रुपयांनी वाढ झाली आहे़ गेल्या वर्षभरात केवळ चार वेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात घट झाली आहे़ उर्वरित वेळा मात्र हे दर वाढतच गेले़ १ मार्च रोजी नांदेडात पेट्रोलचे दर ८०़८८ पैसे, डिझेल ६६़७० पैसे, ८ मार्च रोजी पेट्रोल वाढून ८१़६८ पैसे तर डिझेल ६७़३९ पैसे, १४ मार्चला पेट्रोल ८१़७६, डिझेल ७६़३३ तर २२ मार्च रोजी पेट्रोल ८१़५५ तर डिझेल ६७़३३ पैसे दराने विक्री झाले़ त्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढच झाली़ १ एप्रिल रोजी पेट्रोल ८३ रुपये, डिझेल ६९़१२, ३ एप्रिल रोजी पेट्रोल ८३़२१, डिझेल ६९़३७ रुपये दराने विक्री करण्यात आले़गेल्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलमध्ये जवळपास एक ते सव्वा रुपयाने वाढ झाली़ गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे़ अकोला शहरात बुधवारी पेट्रोलचे दर ८१़८४ पैसे तर डिझेलचे दर ६८़६ पैसे एवढे होते़ नांदेड नजीकच्या इतर जिल्ह्यांत इंधनाचे दर त्या तुलनेत कमी आहेत़ दरवाढीमुळे सामान्यांना वाहन परवडेनासे झाले आहे़ दररोज इंधनाच्या दरात बदल होत असून सामान्य मात्र मेटाकुटीला आले आहेत़जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर परिणाम४पेट्रोल, डिझेलच्या भडकलेल्या दरामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे़ नांदेड शहरात येणारा भाजीपाला हा आजूबाजूच्या परिसरातून येतो़ त्यामुळे भाजीपाल्यासह इतर जीवनावश्यक वस्तूही महाग होण्याची चिन्हे आहेत़ अगोदरच महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना इंधनाच्या भडक्याने बजेट पार कोलमडणार आहे़असे आहेत इतर जिल्ह्यांत दर४२ एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल ८१़ ८४, डिझेल ६८़०८, सिंधुदुर्ग ८२़६६, ६८़८४, रत्नागिरी ८२़७०, ६८़ ७०, सातारा ८१़९९, ६८़३०, मुंबई ८१़८०, ६८़८९ तर पुणे ८१़६७, ६७़८६ अशाप्रकारे पेट्रोल आणि डिझेलचे दर होते़

टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंप