शिवराज बिच्चेवार।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेडमध्येच शिक्षण घेऊन ओळखीचा गैफायदा उचलत नांदेडकरांना तब्बल शंभर कोटींचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाज व विवेककुमार भारद्वाज यांना गुरुवारी सकाळी दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली़ व्हर्च्युअल करंसी, क्रिप्टोकरंसी म्हणजेच अदृश्य चलनाच्या मायाजालात ओढत गेट बिटकॉईनच्या माध्यमातून त्याने नांदेडकरांना गंडविले होते. तोच पोलिसांच्या हाती लागल्याने १०० कोटींची गुंतवणूक करणा-या शहरातल्या तक्रारदारांना दिलासा मिळाला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारद्वाज बंधूंना दिल्ली पोलिसांनी अटक केली. गुरुवारी त्यांना पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जगभरासह भारतातही चलनाला पर्याय ठरु पाहणाºया बिटक्वॉईन या डिजिटल चलनाच्या महाजालात नांदेडातील अनेक प्रतिष्ठीत मंडळी फसविल्या गेली होती़ आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रशांत पाटील यांना अशाचप्रकारे ५५ लाख रुपयांचा गंडा घातल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती पोलिसांच्या लक्षात आली होती़ त्यानंतर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता़ हा अमित भारद्वाज व त्याच्या साथीदारांविरोधातील देशभरातील पहिला गुन्हा होता़ पोलीस अधिक्षकांच्या सुचनेनुसार विमानतळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणात आरोपी अमोल शेंबाळेला दोन दिवसांची कोठडीही सुनावण्यात आली होती़ परंतु आरोपी अमित हा दुबईत पळून गेला होता़या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अमित महेंद्रकुमार भारद्वाज व विवेककुमार भारद्वाज यांना गुरुवारी सकाळी दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली़ दोघांनाही पुणे न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पुण्यातील चौकशी पूर्ण झाल्यानंतर नांदेड पोलीस ताबा मिळविण्याचा प्रयत्न करतील, असे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, गेन बिटकॉईन मधील गुंतवणुकदारांनी नांदेड आणि पुण्यातील कंपनीच्या एजंटकडून भारद्वाज याच्याशी संपर्क केला़ परंतु त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली़ अमीत दुबईत असल्याची माहिती तक्रारदारांना मिळाली होती़ तेव्हा एजंटसोबत परविंदरसिंघ शाहू या गुंतवणुकदाराने थेट दुबई गाठली होती़ परंतु त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते़म्हणे प्रति महिना मिळणार दहा टक्के व्याजबिटकॉईन सॉफ्टवेअरची गुंतवणुक केल्यास प्रती महिना १० टक्के व्याजदर मिळण्याचे आमिष दाखवून गेन बिटकॉईन या कंपनीकडून दाखविण्यात येते़ दिल्लीत कार्यालय असणारा गेन बिटकॉईनचा निमार्ता अमित भारद्वाज याने २००४ साली नांदेड मधील एमजीएम अभियांत्रीकी महाविद्यालयातून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग पुर्ण केले. नांदेडशी असलेल्या संपर्काचा त्याने गैरफायदा घेतला. गेन बिटकॉईन कंपनीच्या पुणे आणि नांदेड मधील एजंट्सनी शहरातील हॉटेलमध्ये काही सेमीनार घेतले. बिटकॉईन सॉफ्टवेअर गेन बिटॅकॉईन कंपनीशी करार करुन दिल्यास १८ महिने बिटकॉईन सॉफ्टवेअरच्या किंमतीच्या १० टक्के वाढीव रक्कम देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यामुळे नांदेड मधील अनेकांनी या गेन बिटकॉईन कंपनीशी करार करुन आपले बिटकॉईन सॉफ्टवेअर दिले. सुरुवातीला २ ते ३ महिने अनेकांना १० टक्के रक्कम प्राप्त झाली, पण त्यानंतर गेन बिटकॉईनकडुन गुंतवणुदारांची फसवणुक सुरु झाली.
नांदेडकरामध्येच शिकला, शंभर कोटींना गंडा घातला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 12:29 AM
नांदेडमध्येच शिक्षण घेऊन ओळखीचा गैफायदा उचलत नांदेडकरांना तब्बल शंभर कोटींचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाज व विवेककुमार भारद्वाज यांना गुरुवारी सकाळी दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली़ व्हर्च्युअल करंसी, क्रिप्टोकरंसी म्हणजेच अदृश्य चलनाच्या मायाजालात ओढत गेट बिटकॉईनच्या माध्यमातून त्याने नांदेडकरांना गंडविले होते. तोच पोलिसांच्या हाती लागल्याने १०० कोटींची गुंतवणूक करणा-या शहरातल्या तक्रारदारांना दिलासा मिळाला आहे.
ठळक मुद्देअखेर पुणे पोलिसांच्या जाळ्यात: गुंतवणूकदारांना दिलासा