नांदेड : नीट परीक्षेच्या निकालात आयआयबीने यंदाही आपले वेगळेपण आणि उच्चांक कायम राखला आहे. आयआयबीच्या ६ विद्यार्थ्यांनी बायोलॉजी विषयात ३६० पैकी तब्बल ३५५ गुण घेवून देशात वेगळा विक्रम प्रस्थापित केला. तसेच जवळपास १ हजार ४० विद्यार्थ्यांनी ३०० हून अधिक गुण मिळविले आहेत.गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांच्या उपस्थितीत आयआयबीच्या वतीने ‘गौरव गुणवंतांचा’ हा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयआयबीचे संचालक दशरथ पाटील हे होते तर उपजिल्हाधिकारी दीपाली मोतीयाळे, भार्गव राजे यांची प्रमुख उपस्थिती होती़. आयआयबीचे संचालक पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात यंदा आयआयबीचे जवळपास दीड हजार विद्यार्थी एमबीबीएस प्रवेशास पात्र ठरतील, असा विश्वास व्यक्त केला. कोणत्याही तक्रारीविना लॉकडाऊन काळात ऑनलाईन शिक्षणाबरोबर घरपोहोच नोट्स आयआयबीने दिल्या. यातूनच आयआयबी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास नेहमीच सज्ज असते, हा विद्यार्थी-पालकांचा विश्वास वृद्धिंगत झाल्याचे त्यांनी सांगितले़ . प्रास्ताविक आयआयबी अकॅडमीचे संचालक डॉ. महेश पाटील यांनी तर शेख सादिक यांनी आयआयबीच्या यशाचा आलेख मांडला. एकावेळी ५० विद्यार्थी व पालक अशी व्यवस्था करून सर्वांना मास्क व हॅण्डग्लोव्हज देण्यात आले़. यशस्वीतेसाठी संचालक प्रा. नरेश भोसले व टीम आयआयबीचे डॉ. प्रभाकर देशमुख, डॉ़. मधुश्री राऊत, प्रा. प्रदीप कुशवाह डॉ. शिवप्रसाद गुंडरे, डॉ.रामकिशन गुंडरे, डॉ.रामप्रसाद हरकल, प्रा. संजय लुकने, प्रा. अभिजित राक्षे, डॉ. अश्विन दापकेकर प्रा. डॉ. जयंत राऊत, प्रा. समीर कुलकर्णी, सल्लागार बालाजी कदम आणि व्यवस्थापक संतोष पाटील, अक्षय नळदकर, भास्कर पाटील, विश्वास पाटील आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान, काही निवडक विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी डॉ़ विपीन इटणकर यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात गौरव करीत आयआयबीच्या विविध उपक्रमांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. (व्या. प्र.)
मराठवाड्यासह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नीटच्या तयारीसाठी राजस्थान, दिल्ली व इतर राज्यांत जाण्याची गरज नसून मागील काही वर्षांपासून आयआयबी नीटमध्ये नवनवीन विक्रम करण्याचे काम करत आहे़ यंदाही एकूण १०४० विद्यार्थ्यांनी बायोलॉजी विषयात ३६० पैकी ३०० पेक्षा अधिक गुण मिळविल आहेत़ तर एकूण ७२० पैकी ५०० हून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७२३ आहे़.