शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
2
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
3
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
4
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
5
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
6
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
7
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
8
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
9
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
10
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
11
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
12
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
13
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
14
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
15
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
16
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
17
नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी
18
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
19
Kolkata Doctor Case : संदीप घोष, अभिजित मंडलच्या मोबाईलमध्ये दडली आहेत अनेक गुपितं; CBI चा मोठा दावा
20
भारतात कुठे वापरले जातात सर्वाधिक कंडोम? राज्याचं नाव जाणून थक्क व्हाल!

नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा; तेजबीरसिंगने आशियाई तिरंदाजीत साधला सुवर्णपदकावर नेम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 7:21 PM

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाकडून तेजबीर सिंग हा आशियाई धनुर्विद्या स्पर्धेत सहभागी झाला होता.

नांदेड : चीन येथील तायपेई येथे सुरू असलेल्या आशियाई विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेत तेजबीरसिंग जहागीरदारने रविवारी सुवर्णपदक पटकावत नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याने पाच फेऱ्यांत एकूण १४५ गुणांसह सुवर्णपदकावर कब्जा केला.

तेजबीरसिंग जहागीरदार हा मूळचा नांदेडचा असून, त्याचे शालेय शिक्षण नांदेड येथेच झाले. तो इयत्ता आठवीपासूनच धनुर्विद्या स्पर्धेत खेळत आहे. शालेय शिक्षणानंतर त्याने हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे बहिर्जी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे सध्या बीएससीचे शिक्षण घेत असून, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाकडून तेजबीर सिंग हा आशियाई धनुर्विद्या स्पर्धेत सहभागी झाला होता. चीन येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत तेजबीर सिंग जहागीरदार याने सहा फेऱ्या पार करत अंतिम फेरी गाठली. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्याने शेवटची फेरी जिंकून भारताला सुवर्णपदक प्राप्त करून दिले.

ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची इच्छाहे यश गुरुगोविंदसिंगजी यांच्या आशीर्वादामुळे तसेच प्रशिक्षक, आई-वडील यांच्या सहकार्यामुळे मिळू शकले. भविष्यात देशासाठी सुवर्णपदक जिंकायचे असून ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यास मी नक्कीच भारताचे नावलौकिक करेन.-तेजबीर सिंग जहागीरदार, सुवर्णपदक विजेता

यापूर्वी तीनवेळा केले भारताचे प्रतिनिधित्वयापूर्वी तेजबीरसिंग जहागीरदार याने विद्यापीठाकडून खेळताना यापूर्वी तीनवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, त्याला पदकाने हुलकावणी दिली होती. या वेळेस मात्र तो सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी झाला.

देशाची मान उंचावलीतेजबीरसिंग याने कठोर मेहनत करून नांदेड सचखंड गुरुद्वाराचे मुख्य पुजारी संत बाबा कुलविंतसिंगजी, संत बाबा बलवंतसिंगजी, संत बाबा रामसिंगजी यांच्या आशीवार्दाने नांदेडसह देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.-चरणकमलजीत सिंग जहागिरदार-तेजबीरसिंगचे वडील...........

 

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडEducation Sectorशिक्षण क्षेत्र