स्वामी रामानंद तीर्थ स्मृती दालनास भेट देऊन स्वामीजींच्या दुर्मीळ छायाचित्रांची तसेच हैद्राबाद मुक्ती संग्रामावरील ग्रंथसंपदा व विद्यापीठ प्रकाशनाबद्दल जाणून घेतले. त्यांनी नियतकालिके, संदर्भ सेवा, इंटरनेट लॅब, ज्ञान स्रोत समिती कक्ष इत्यादी विभागांना भेट दिली. यात त्यांनी थेसिस ऑफ द मंथ, भारतीय अर्थसंकल्प कात्रण सेवा, सीडी लायब्ररी, प्रबंध डिजिटायझेशन, प्लॅगॅरिझम तपासणी प्रक्रिया, पीएच.डी. प्रबंध सीडी, शोधगंगा, शोधगंगोत्री प्रकल्पातील सहभाग, दिव्यांग कक्ष, ब्रेली ग्रंथसंपदा इत्यादींविषयी माहिती घेऊन सविस्तर चर्चा केली.
प्र. संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी यांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी ज्ञान स्रोत केंद्राच्या प्रगतीची प्रशंसा करून दोन्ही विद्यापीठांच्या ज्ञान स्रोत केंद्रांनी परस्पर समन्वय व सहकार्याची गरज विशद केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहिती शास्त्रज्ञ रणजित धर्मापुरीकर यांनी तर आभार डॉ . राजेश काळे यांनी मानले. यावेळी जी. एन. लाठकर, डॉ. अरुण हंबर्डे, सायलू नरोड, डी. एस. पोपळे, खाजामिया सिद्दीकी, मोहनसिंग पुजारी, पांचाळ, बी. आर. कांबळे आदींची उपस्थिती होती.