शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

‘एनसीबी’च्या धाडींनी नांदेड जिल्हा पाेलीस दलाच्या कर्तव्य दक्षतेवरच प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 8:02 PM

NCB Raids In Nanded : एनसीबीच्या दाेन धडक कारवायांनी जिल्हा पाेलिसांच्या एकूणच कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

नांदेड : एनसीबीने (NCB ) आठवडाभरात पाठोपाठ दोन धाडी जिल्ह्यात यशस्वी केल्याने स्थानिक पोलिसांच्या एकूणच कर्तव्य दक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या कारवाईने नांदेड हे अंमली पदार्थांची तस्करी, साठा, वाहतूक व वापराचे प्रमुख केंद्र बनत अल्स्याचे समोर आले आहे. ( NCB Raids In Nanded, Question Marks On Police ) 

एनसीबीच्या मुंबईतील पथकाने सतत पाळत ठेवून आंध्र प्रदेशातून नांदेडमार्गे खान्देशात जाणारी काेट्यवधी रुपयांच्या गांजाची खेप पकडली. थेट वरच्या स्तरावरून झालेल्या या कारवाईने स्थानिक पाेलीस प्रशासन अस्वस्थ असतानाच एनसीबीने जिल्हा पाेलिसांना नुकताच दुसरा धक्का दिला. येथून डाेडा हे अंमली पदार्थ जप्त केले गेले. त्याचा कारखाना उद्ध्वस्त केल्याचे एनसीबीने म्हटले आहे. एनसीबीच्या या दाेनही धडक कारवायांनी जिल्हा पाेलिसांच्या एकूणच कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. एनसीबीची चमू आठवडाभर पाळत ठेवून व मुंबईहून भल्या पहाटे नांदेड जिल्ह्यात येऊन १ हजार १२७ किलाे गांजाची खेप पकडते आणि स्थानिक पाेलिसांना याबाबत पुसटशी कल्पनाही नसावी, हे एक कोडेच आहे. खुद्द एनसीबीनेही याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे.

एनसीबीच्या कारवाईने नांदेड शहरच नव्हे तर, ग्रामीण क्षेत्रसुद्धा अंमली पदार्थाच्या तस्करी व साठ्याचे शिवाय कच्चा माल आणून अंमली पदार्थाच्या निर्मितीचे केंद्र बनल्याचे अधाेरेखित झाले आहे. जिल्ह्याला तेलंगाणा-आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांची सीमा लागून आहे. या सीमावर्ती भागातूनच अंमली पदार्थ, प्रतिबंधित गुटखा, सुपारी माेठ्या प्रमाणात नांदेडमध्ये आणली जाते. याच मार्गाने ती इतर राज्यात व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात पाेहाेचविली जाते. एवढे सगळे हाेत असताना पाेलिसांकडून मात्र गांजाची छुटपूट केस करून रेकाॅर्डवर ‘कामगिरी’ दाखविली जाते. एनसीबीच्या कारवाईने अशा कामगिरीसाठी नांदेड शहर व जिल्ह्यात पाेलिसांना प्रचंड वाव असल्याचे स्पष्ट हाेते. एनसीबीने पाठाेपाठ दाेन ठिकाणी टाकलेल्या धाडींनी जिल्हा पाेलिसांचे अपयश उघड केले आहे. किमान आतातरी जिल्हा पाेलीस अंमली पदार्थाची तस्करी राेखण्यासाठी स्थानिक पातळीवर माेहीम उघडतील काय?, याकडे लक्ष लागले आहे.

नांदेड दंगलीने ‘उद्ध्वस्त नेटवर्क’चा मुद्दा ऐरणीवरनांदेडमध्ये अचानक दंगल उसळली. पाेलिसांवर दगडफेक करण्यात आली. ही घटना पाहता पाेलीस कमालीचे बेसावध असल्याचे दिसून आले. या घटनेने इंटेलिजन्स ब्युराे (आयबी), राज्य गुप्तवार्ता विभाग (एसआयडी), जिल्हा विशेष शाखा (डीएसबी) आणि पाेलीस ठाण्यांची खुफिया यंत्रणा या सर्वांचेच खबऱ्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येते. मात्र उच्चपदस्थ पाेलीस प्रशासन पाेलिसांचे हे अपयश मानण्यास तयार नाहीत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्तचर यंत्रणेला १०० टक्के खरीच माहिती मिळेल हे सांगणे कठीण आहे. या दंगलीनंतर दाेन दिवसांनी (१६ नाेव्हेंबर दरम्यान) पुन्हा दगडफेक हाेईल असा अंदाज प्रमुख गुप्तचरांनी अप्पर पाेलीस महासंचालक संजीवकुमार यांच्यापुढे वर्तविला हाेता. मात्र प्रत्यक्षात ही दगडफेक झाली नाही. यावरून गुप्तचरांचा अंदाज खोटा ठरल्याचे स्पष्ट होते.

दंगल वेळीच राेखण्यात पाेलीस यशस्वीअचानक व अनपेक्षितरित्या जमाव रस्त्यावर उतरल्याने दगडफेक व तणावाची स्थिती निर्माण झाली असली तरी ती नियंत्रित करण्यात व दंगल आणखी पसरू न देण्यात जिल्हा पाेलीस यशस्वी झाल्याचे उच्चपदस्थ पाेलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. नांदेडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न एक दिवस निर्माण झाला व त्याचदिवशी संपला. ताे शहराच्या इतर भागात पसरू न देणे हीच पाेलिसांची खास कामगिरी राहिली. अन्य जिल्ह्यात मात्र हाच तणाव अनेक दिवस कायम राहून संचारबंदी लावण्याची वेळ आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. दंगल उसळलेल्या इतर जिल्ह्यांचा विचार केल्यास नांदेड जिल्हा पाेलिसांची कामगिरी घटनेनंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात सरस ठरल्याचे प्रमाणपत्रही या अधिकाऱ्याने दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोNandedनांदेड