शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

ट्रक चालकाची बेपर्वाई; कार, दुचाकी, टेम्पोस उडवत पानटपरीस ४० फुट फरफटत नेले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 7:24 PM

भोकर बायपासवर ट्रकने उडवल्याने कार चालक गंभीर जखमी झाला आहे

भोकर ( नांदेड): चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रकने कारसह टेम्पो, दुचाकी आणि पानटपरीला जबर धडक दिल्याची घटना आज दुपारी येथील म्हैसा बायपास चौक येथे घडली आहे. यात कार चालक गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला नांदेडला रवाना करण्यात आले आहे. 

भोकर बायपासवरील म्हैसा कडून नांदेडकडे सिमेंट वाहतूक करणारा ट्रक (क्रं. टिएस ०१ यु ए ७७१२) भरधाव वेगाने जात होता. दरम्यान भोकर येथून उमरीकडे जाणाऱ्या कारला (क्र. एम एच २६ एए ५५५६) बायपासवरील सुभेदार रामजी चौक येथे ट्रकने जबर धडक दिली. त्यानंतर अनियंत्रित ट्रकने रस्त्यावर उभी दुचाकी, टेम्पो (क्रं. एम एच २६ एडी ५५४०) आणि पान टपरीस जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात कार चालक शुभंम अनिल पांचाळ (२२, रा. भोकर ) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी नांदेडला रवाना करण्यात आले आहे. 

पानटपरीस ४० फुट फरफटत नेलेया भीषण अपघातात टेम्पोचा चुराडा झाला. तर ट्रक पलटी होवून एका पान टपरीवर आदळला. त्यानंतर ट्रकने पान टपरीस ४० फुट दूर फरफटत नेले. दरम्यान, ट्रक चालक घटना स्थळावरुन पसार झाला असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. याच ठिकाणी दि. २३ डिसेंबर २०२२ रोजी एका भरधाव ट्रकने ऑटोरिक्षाने दिलेल्या धडकेत एका प्रवासी महिलेचा जागीच  मृत्यू झाला होता.

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड