चौकट- परभणी, हिंगाेली मार्ग
नांदेडला येण्यासाठी वसमत व नंतर मालेगावरोड हा प्रमुख रस्ता आहे. या मार्गाहून हिंगोली जिल्ह्यातून तसेच परभणी जिल्ह्यातून अनेक वाहने नांदेडला येतात. या मार्गावर पोलीस पथक वाहनांची तपासणी करत आहे. मात्र, अनेक वाहने चोरट्या मार्गाने नांदेडला येत आहेत. त्यामुळे ही पोलीस चौकी नावालाच असल्याचे सांगण्यात आले. अनेक वाहने बिनदिक्कतपणे फिरत आहेत.
चौकट- उमरखेड, हदगाव मार्ग
विदर्भातून नांदेडला येण्यासाठी उमरखेड, हदगाव हा प्रमुख मार्ग आहे. कोरोना काळात या मार्गावरून नांदेडला रूग्ण येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या मार्गावर असलेल्या चेकपोस्टवर पोलीस प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत. ज्यांच्याकडे ई पास आहे, अशांना प्रवेश दिला जात आहे. परंतु काही वाहनांना क्वारंटाईनच्या होण्याच्या अटीवर प्रवेश दिला जात आहे.
चाैकट- कर्नाटक सीमेवर तपासणी
मुखेड तालुक्यातील रावणकोळा या गावाजवळ लातूर जिल्हा व कर्नाटक सीमेवर पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. परजिल्ह्यातून तसेच परप्रांतातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करण्यात येत आहे. याठिकाणी बाहेर राज्यातून कोरोना बाधित रूग्ण येऊ नयेत, यासाठी लक्ष ठेवले जात आहे. तसेच इतर जिल्ह्यातील वाहनांनाही प्रवेश नाकारण्यात येत आहे.
चौकट- तपासणीचे निर्देश
१. जिल्ह्याच्या प्रत्येक सीमेवर चेकपाेस्ट उभारून त्या ठिकाणी प्रवासी वाहनांची तपासणी करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिले आहेत.
२. ज्यांच्याकडे ई पास आहेत, अशांनाच जिल्ह्यात प्रवेश देता येणार आहे. अन्यथा इतरांना सीमेवरून परत पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
३. ऑक्सिजन, गंभीर रूग्ण, वैद्यकीय सेवा सुविधा आदींचा विचार करता त्यांना जिल्ह्यात अथवा जिल्ह्याबाहेर प्रवेश देण्यात येणार आहेत.