लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : यवतमाळ जिल्ह्यातील कार्यक्रमाला जाण्यासाठी नांदेड विमानतळावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यास गेलेल्या भाजपाच्या महानगराध्यक्षांसह इतर पदाधिकाºयांना पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी प्रवेश नाकारला़ विशेष म्हणजे, या पदाधिकाºयांकडे सुरक्षा पास होते़ तर दुसरीकडे सेनेचे आ़ हेमंत पाटील यांना मात्र भेटीसाठी थेट प्रवेश देण्यात आला़ यावेळी भाजपा पदाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांमध्ये बराच वेळ गरमागरमी झाली़यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड येथे कार्यक्रमासाठी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते़ दुपारी ३ वाजता त्यांचे नांदेड येथे आगमन झाले़ मुख्यमंत्री येण्यापूर्वीच त्यांच्या भेटीसाठी शिवसेनेचे आ़हेमंत पाटील यांच्यासह भाजपाचे महानगराध्यक्ष डॉ़संतुकराव हंबर्डे, चैतन्यबापू देशमुख, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, संजय कौडगे, व्यंकटेश साठे, प्रवीण साले आदी पदाधिकारी विमानतळावर पोहोचले होते़ मुख्यमंत्र्यांचे विमान उतरताच भाजपा पदाधिकाºयांनी त्यांच्या भेटीसाठी धाव घेतली़ परंतु यावेळी पोलीस अधीक्षक मिना यांनी त्यांना अडविले़ सुरक्षा पास असताना आमची अडवणूक का केली जात आहे, असा प्रश्नही हंबर्डे यांनी केला़ सुरक्षा पासही दाखविला, परंतु पोलीस अधीक्षकांनी त्यांना आत सोडलेच नाही़ त्याचवेळी आ़ हेमंत पाटील यांना मात्र भेटीसाठी थेट प्रवेश देण्यात आला़ त्यानंतर भाजपा पदाधिकाºयांचा पारा आणखीच चढला़ बराच वेळ गरमागरमी सुरु होती़ तेवढ्या वेळात मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसून रवाना झाले होते़ त्यामुळे भाजपा पदाधिकाºयांचा भ्रमनिरास झाला़ उमरखेडहून नांदेडला परत आल्यावर मात्र त्यांना भेटीसाठी सोडण्यात आले़मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी आमच्याडे सुरक्षा पास असूनदेखील अडवणूक केली़ तर आमदारांना थेट सोडले तेव्हा त्यांच्याकडे पासची पोलीस प्रशासनाने का चौकशी केली नाही, असा प्रश्न भाजप महानगराध्यक्ष डॉ़ संतुकराव हंबर्डे यांनी उपस्थित केला़ तर आमदारांना पासची गरज नाही का, असा सवाल त्यांनी पोलीस अधीक्षकांना विचारला़
नांदेड विमानतळावर भाजप पदाधिकाऱ्यांना ‘नो एन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:55 AM
लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : यवतमाळ जिल्ह्यातील कार्यक्रमाला जाण्यासाठी नांदेड विमानतळावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यास गेलेल्या भाजपाच्या महानगराध्यक्षांसह इतर पदाधिकाºयांना पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी प्रवेश नाकारला़ विशेष म्हणजे, या पदाधिकाºयांकडे सुरक्षा पास होते़ तर दुसरीकडे सेनेचे आ़ हेमंत पाटील यांना मात्र भेटीसाठी थेट प्रवेश देण्यात आला़ यावेळी ...
ठळक मुद्देमुख्यमंत्री विमानतळावर : सेना आमदार मात्र थेट भेटीला