‘ना किसीसे दोस्ती, ना किसीसे बैर’; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी घेतला राजकीय सन्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 04:37 PM2020-05-28T16:37:34+5:302020-05-28T16:43:43+5:30

विचारांची शिदोरी सोबत घेवून आज मी माझे राजकारण थांबवित असल्याचे सूर्यकांता पाटील यांनी म्हटले आहे.

‘No friendship, no hatred’; Former Minister Suryakanta Patil took political retirement | ‘ना किसीसे दोस्ती, ना किसीसे बैर’; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी घेतला राजकीय सन्यास

‘ना किसीसे दोस्ती, ना किसीसे बैर’; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी घेतला राजकीय सन्यास

googlenewsNext
ठळक मुद्दे १९८६ मध्ये काँग्रेसकडून त्या राज्यसभेवर १९९१, १९९८ आणि २००४ असे तीन वेळा  त्या लोकसभेत पोंहचल्या.केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री या पदाची धुराही त्यांनी सांभाळली.नंतरच्या काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

नांदेड : आक्रमक नेत्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी बुधवारी रात्री उशिरा सोशल मिडियावर संदेश टाकत राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. आजवर एकटीने सगळं जिंकलं, परंतु कंटाळा येईपर्यंत प्रवास करण्याची माझी तयारी नसल्याचे सांगत विचारांची शिदोरी सोबत घेवून आज मी माझे राजकारण थांबवित असल्याचे सूर्यकांता पाटील यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या सूर्यकांता पाटील यांची कारकीर्द चढती राहिली आहे. नांदेड नगरपालिकेत नगरसेवक म्हणून आपल्या कामाची चुणूक दाखविल्यानंतर १९८० मध्ये हदगाव मतदारसंघातून निवडून येत  त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर १९८६ मध्ये काँग्रेसकडून त्या राज्यसभेवर गेल्या तर १९९१, १९९८ आणि २००४ असे तीन वेळा  त्या लोकसभेत पोंहचल्या. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री या पदाची धुराही त्यांनी सांभाळली. मात्र नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकी वेळी हिंगोली मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तरीही विधान परिषदेवर वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु पक्षाने रामराव वडकुते या नव्या चेहऱ्याला मैदानात आणले. त्यानंतर सूर्यकांता पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर झाल्या. नंतरच्या काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.  बुधवारी रात्री उशिरा फेसबुकवर पोस्ट करीत आपण राजकीय प्रवास थांबवित असल्याचे म्हटले आहे. या पुढे नव्या पिढीसाठी काम करीन, घरी बसणार नाही, असेही त्यांनी या संदेशामध्ये म्हटले आहे.

सूर्यकांता पाटील यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट अशी आहे...

आता थांबावे असे वाटत नाही,
खूप प्रेम मिळाले जळणारे होते, पण प्रेम करणाºयांची संख्या अधिक होती. मला ते सर्व मिळाले जे सामाजिक जीवनात असणाºया व्यक्तीला मिळायला हवे, ४३ वर्ष राजकारणात होते़ एखाद्या राजकुमारी सारखी राहिले़ ४०० रुपयांची साडी ४००० हजाराच्या थाटात नेसली. मिळालेले काम मन लावून केले. आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत आणि अशा अनोख्या प्रांतात माझ्या सारखी मनस्वी रमू शकत नाही. राजीनामा लिहून तयार होता, पण मी आहेच कोण म्हणून, एवढा  शो करायचा? सगळ्यांनीच प्रेम दिले, सन्मान दिला, काहीच तक्रार नाही. आपलीच लायकी नाही हे समजले होते, रागात घेतलेले निर्णय असेच असतात, ते योग्य की अयोग्य हे सारासार बुद्धीला जेव्हा ठरविता येत नाही़ तिथे तोंडाला नवा रंग लावून विचार बदलत नाहीत, हे पक्के समजलंय. त्यामुळे धाकटे लोक राजकारण सोडतो म्हणत असताना मला आता काय मिळवायचे आहे? एकटीने सगळे जिंकले, लोकांना कंटाळा येईपर्यंत प्रवास करायची माझी तयारी नाही. ज्यांच्यासाठी काम केले त्यांनी सन्मानही केला आणि आज जे नाहीच आहेत त्यांच्या आठवणी मनात आहेत. आपण फार खुज्या प्रांतात प्रवासी झालो याची खंत आहे. पण माझा निस्वार्थ प्रवास मला फार समृद्ध करून गेला. जेव्हा लिहायचे तेव्हा लिहिलं पण आज मी माझा राजकीय प्रवास थांबवित आहे. यापुढे नव्या पिढीसाठी काम करीन, घरी बसणार नाही. बसून कुरवळण्याएवढे काही नाही माझ्याजवळ. विचारांची शिदोरी घेऊन आज मी माझे राजकारण थांबवित  आहे.  सगळ्या सहप्रवासी सहकाºयांचे हार्दिक आभार. मी आहे, कधीही या, घर आणि मी तुमचीच आहे. नमस्कार सगळ्यांना़ थांबते.
 

Web Title: ‘No friendship, no hatred’; Former Minister Suryakanta Patil took political retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.