नांदेड : शहरातील काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रातील वॉल व दुरुस्ती आणि मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम २२ एप्रिल रोजी हाती घेण्यात येणार असल्याने उत्तर नांदेडला होणारा पाणी पुरवठा २२ आणि २३ एप्रिल रोजी बंद राहणार आहे.महापालिकेने हाती घेतलेल्या या दुरुस्ती कामामुळे काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रावरुन भरण्यात येणाऱ्या तरोडा बु., तरोडा खु. व सांगवी परिसर, वर्कशॉप जलकुंभ, सुंदरनगर जलकुंभ, पीरबुºहाननगर जलकुंभ, दरवेशनगर जलकुंभ, नंदीग्राम हौसिंग सोसायटी जलकुंभ या भागातील पाणी पुरवठा खंडीत राहणार आहे. त्याचवेळी नाना-नाणी पार्क जलकुंभ, गोकुळनगर जलकुंभ, आंबेडकरनगर जलकुंभ, लेबर कॉलनी जलकुंभ, श्रावस्तीनगर जलकुंभ, राममंदिर जलकुंभ, शक्तीनगर जलकुंभ, हैदरबाग जलकुंभ, बोंढार जलकुंभ, ट्रेचिंग ग्राऊंड जलकुंभ या जलकुंभावरुन होणारा पाणी पुरवठा २२ आणि २३ एप्रिल रोजी बंद राहणार आहे.महापालिकेच्यावतीने काबरानगर येथील ६० दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये चॅनल वॉल्व दुरुस्तीचे काम आणि काबरानगर येथीलच ३५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.या दुरुस्तीच्या कामामुळे संपूर्ण उत्तर नांदेडसह दक्षिण नांदेडच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ऐन उन्हाळ्यात महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या या दुरुस्ती कामामुळे उत्त्तर नांदेडकरांना दोन दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.
उत्तर नांदेडात आजपासून दोन दिवस निर्जळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 1:22 AM