तालुक्यातील नागापूर येथे टीएसपी योजने अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे ३३ लक्ष ४७ हजार ३४४ रुपये किमतीचे हे काम २४ महिन्यात पूर्ण करण्याचा कालावधी होता या काळात केवळ विहीर खोदकाम केले असून पाईपलाईन, टाकी चे काम अर्ध्यावर ठेवले आहे या कामांचे मूल्यांकन होऊन संबंधित कन्ट्रक्शनने ८ लाख ७० हजार ९८२ रुपये उचल केली आहे अशी लेखी तक्रार सरपंच व ग्रामसेवक यांनी जिप ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे किनवट येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली. त्यावरून उपविभागीय अधिकारी किशोर संद्री यांनी माळाकोळी ता लोहा व नांदेड येथील एक अशा दोन कन्ट्रक्शनला दि १३ नोव्हेंबर २०२० रोजी नोटीस बजावली त्यात विहित कालावधीत योजना पूर्ण होऊ शकली नसल्याने ग्रामस्थांना त्याचा वेळेवर लाभ झालेला नाही त्यामुळे आजमितीस केलेला खर्च अनाठायी ठरला आहे वारंवार पाठपुरावा करूनही काम पूर्ण करण्याबाबत ५ डिसेंबर २०२० पर्यंत दिरंगाई झाल्यास आपली नोंदणी रद्द करून काळ्या यादीत टाकण्यात येईल असा इशारा दिलेला आहे.
संबंधित पाणीपुरवठा समितीनेही अर्धवट सोडून दिलेल्या कामाबाबत वारंवार काम पुर्ण होण्यासाठी संबंधित कन्ट्रक्शनला पाठपुरावा केला आहे. अर्धवट काम मार्गी लावण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी विडा उचलला आहे त्यातच नांदेड जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाविसकर यांनी या कामांना आज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे आदिवासी विकास निरीक्षक संदीप कदम यांना सोबत घेऊन भेटी दिल्याने येत्या काळात काम मार्गी लागून गावकऱ्यांना नळ योजनेचे पाणी पिण्यास मिळणार आहे त्यासाठी तसा दट्टा उपविभागीय अधिकारी यांनी लावला आहे हे कन्ट्रक्शनला बजावलेल्या नोटीसी वरून स्पष्ट होत आहे