मुस्लिमांचे कब्रस्थानात दफन
हॅपी क्लबच्या वतीने मुस्लिम समाजातील मयतावर कब्रस्थानात दफन करण्यात येत आहे. तर महापालिकेच्या वतीने इतर धर्मियांवर गोवर्धन घाट आणि सिडको येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. अचानक मृत्यू होणार्यांची संख्या वाढल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे हॅपी क्लबचे मोहम्मद शोएब यांनी सांगितले.
एनओसीला लागतोय वेळ
रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर संबधित रुग्णालय आणि पोलिस ठाण्याकडून अंत्यसंस्कार करणार्यांकडे एनओसी पाठविण्यात येते. सध्या एनओसी मिळण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी विलंब लागत आहे.
सहा दिवसात ४७ जणांचा मृत्यू
कोरोनामुळे गेल्या सहा दिवसात ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. १९ मार्च रोजी ५, २० मार्च ७, २१ मार्चला ९, २२मार्च १०, २३ मार्च १० आणि २४ मार्चला ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे ६७४ जणांचा मृत्यू झाला आहे.