लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेत सुरू असलेल्या नगरसेवक कंत्राटदाराच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच मनपात देयकांसाठी फिरणाºया नगरसेवक कंत्राटदारांची संख्या घटली आहे. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर प्रशासनानेही देयक अदा करण्यासंदर्भात धोरणही आखले आहे. ज्येष्ठता क्रमानुसारच यापुढे देयके अदा केले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.महापालिकेत निवडणूक निकालानंतर इतर राजकीय घडामोडी थंडावल्या असल्या तरी नगरसेवक कंत्राटदारांच्या मात्र मोठ्या प्रमाणात फेºया सुरू होत्या. या फेºया विशेषत: आयुक्त, लेखाधिकारी तसेच बांधकाम उपायुक्तांकडे मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. देयकांसाठी नगरसेवकाकडून मोठ्या प्रमाणात पाठपुरावा सुरू होत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर आयुक्तांनी याबाबत काहींना सुनावलेही होते. कंत्राटदार नगरसेवकांना आळा घालण्यासाठी नियमावलीवर बोट ठेवले होते. याबाबत ‘लोकमत’ने २८ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. नगरसेवकांकडून विकास कामासंदर्भात नव्या संकल्पना, नवी धोरणे सुचवणे अपेक्षित असताना केवळ देयकांसाठी अधिकाºयांचे उंबरठे झिजवणे ही बाब न पटणारी होती. नियमानुसार नगरसेवकांना ठेकेदारी करता येत नाही, ही बाब स्पष्ट करण्यात आली होती. त्यामुळे देयकांसाठी अधिकाºयांचे उंबरठे झिजवणाºया नगरसेवकांची संख्या सध्या घटली आहे.थकित देयके अदा करण्यासाठी आता नवे धोरण महापालिका आयुक्त देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार थकित देयकेही कालावधीनुसार देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जुने देयके आधी अदा केले जातील. त्याचवेळी मोठ्या रकमेचे देयक असेल तर ते काही टप्प्यात देण्यात येईल. मात्र देयकेही नियमितपणे अदा केले जातील.दरम्यान, नव्या कामांच्या निविदांना कितपत प्रतिसाद मिळतो हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. शहरातील प्रमुख रस्ते, प्रमुख चौक यांच्या दुरुस्ती कामांच्या निविदा महापालिकेने प्रसिद्ध केल्या आहेत. जवळपास साडेचार कोटी रुपयांची ही कामे अपेक्षित आहेत. खड्डे बुजवण्याच्या कामाला कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला असून तरोडा, शिवाजीनगर, सिडको या तीन झोनमधील रस्ते बुजवण्यासाठी कामांसाठी तीन निविदा प्राप्त झाल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होताच रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.१२३ देयके केली मनपाने अदा४महापालिकेच्या कर्जमुक्तीसाठी पुढाकार घेताना आयुक्त देशमुख यांनी ५० हजार ते एक लाखापर्यंतची देयके तत्काळ अदा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनपाने भांडार विभागाची २०१६-१७ पर्यंतची सर्व बिले अदा केली जात आहेत. यामध्ये ३१ लाख ५ हजार ८१४ रुपये रकमेचा समावेश आहे. आकस्मिक व बांधकाम, पाणीपुरवठा विभागाचेही १५ कंत्राटदारांची देयके अदा केली असून या कंत्राटदारांना १७ लाख ६१ हजार ४१६ रुपये दिले आहेत. आकस्मिक व बांधकाम, पाणी पुरवठ्याचे एक लाखाच्या आतील बिले अदा केली आहेत. मनपाने आतापर्यंत १२३ देयके अदा केली असून त्यापोटी ८० लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. यापुढे ज्येष्ठता क्रमानुसार देयके देण्यात येणार आहेत.
नांदेड महापालिकेत कंत्राटदार नगरसेवकांची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 12:59 AM
नांदेड : महापालिकेत सुरू असलेल्या नगरसेवक कंत्राटदाराच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच मनपात देयकांसाठी फिरणाºया नगरसेवक कंत्राटदारांची संख्या घटली आहे. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर प्रशासनानेही देयक अदा करण्यासंदर्भात धोरणही आखले आहे. ज्येष्ठता क्रमानुसारच यापुढे देयके अदा केले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
ठळक मुद्देमहापालिका : जुने देयके अदा करण्याबाबत आखले धोरण, ज्येष्ठता क्रमानुसार देयके अदा करणार