जिल्ह्यात गुरुवारी ४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात नांदेडमधील जिल्हा रुग्णालय काेविड हाॅस्पिटल येथील ११, एनआरआय भवन व गृहविलगीकरणातील २०, किनवट १, देगलूर १, नायगाव ३ आणि खाजगी रुग्णालयातील १० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आजघडीला ३२७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात असलेल्यांची संख्या १३७ तर तालुकास्तरावर ५५ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. विष्णुपुराणादी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल २९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नवी इमारत २९, मुखेड काेविड हॉस्पिटल २१, भोकर २, हदगाव ६ आणि खाजगी रुग्णालयात २५ रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ११ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली. जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.८० टक्क्यावर पोहोचले आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या २० हजार ७२८, कोरोना बळींची संख्या ५४५ तर बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा १९ हजार ६५२ इतका झाला आहे.
कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:44 AM