नांदेड : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. त्याचबराेबर कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब दिलासा देणारी असली, तरी रुग्णांच्या मृत्यूचे दृष्टचक्र अद्यापही थांबलेले नाही. शुक्रवारी आणखी २८ जणांचा काेरोनामुळे मृत्यू झाला तर १,२१० नवे बाधित आढळले असून, १,३३७ जणांनी काेरोनावर यशस्वीपणे मातही केली आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अधिक आहे. मागील आठवड्यातच राज्याच्या आरोग्य विभागाने मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजना राबविण्याच्या सूचना नांदेड प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र, मृत्यूंच्या घटनेत अद्यापही घट झाली नसल्याचे दिसते. शुक्रवारी २८ जणांचा मृत्यू झाला. यातील १० जण हे नांदेड शहरातील आहेत. शुक्रवारी कोरोना तपासणीचे ४ हजार ५०९ तपासणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १,२१० जण पॉझिटिव्ह आढळले. आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात ४९६, बिलोली ३, कंधार ५६, मुखेड ११, हिंगोली ५, परभणी ३, नांदेड ग्रामीण २५, देगलूर ४८, किनवट २, नायगाव २४, लातूर १, निझामाबाद १, अर्धापूर ४५, धर्माबाद ३५, लोहा ४२, उमरी २ तर अकोला जिल्ह्यातील एकजण नांदेडमध्ये बाधित आढळला.
ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात ४५ जण बाधित आढळले तर बिलोली आणि हिमायतनगर येथे प्रत्येकी २, माहूर २९, उमरी १९, यवतमाळ १, नांदेड ग्रामीण १३, देगलूर ७, कंधार ११, मुदखेड १७, नागपूर २, हिंगोली २, अर्धापूर ३, धर्माबाद ५, किनवट ५२, मुखेड २६, मुंबई २, परभणी २, भोकर ६, हदगाव १९, लोहा १८, नायगाव ३१ तर अमरावती जिल्ह्यातील एकजण नांदेडमध्ये बाधित आढळला.
चौकट...........
ॲक्टिव्ह रुग्णसंख्येत प्रथमच घट...
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढलेला आहे. मात्र, ॲक्टिव्ह रुग्णसंख्येत शुक्रवारी प्रथमच घट झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात १,२१० बाधित आढळले आहेत, त्याचवेळी १,३३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये विष्णूपुरी रुग्णालयातील २०, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह अलगीकरण ६९९, धर्माबाद ७, देगलूर ७, अर्धापूर २९, उमरी ३४, माहूर २२, मुखेड ८०, बिलोली ५६, किनवट १९, हिमायतनगर ३५, बारड ९८, खासगी रुग्णालये १२५, आयुर्वेदिक महाविद्यालय १३, हदगाव १०, कंधार ७, नायगाव १४, लोहा २७ आणि मांडवी येथील ६ जणांनी कोरोनावर मात केली.